Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

राष्ट्रपतींची मंजूरी नाहीच: अखेर महाराष्ट्र परिवहन कायदा दुरूस्तीचे विधेयक मागे एसटीसाठीचे स्वतंत्र वाहतूक धोरण बारगळले- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र परिवहन कायद्यातील दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही न केल्याने आणि राज्यात केंद्राचा मोटार वाहन कायदा लागू करण्यात आल्याने अखेर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविलेले विधेयकच मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. २०१७ साली …

Read More »

पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपु प्राधिकरणामध्ये समावेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारकडून हक्काचे घर देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाची हद्दीत आता ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर नंतर आता पालघर आणि बोईसर नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला असून यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा …

Read More »

१५ हजार नवे बाधित तर ३५ हजार बरे होवून घरी गेले: ९१ ओमायक्रॉन रूग्ण ३९ बाधितांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत सातत्याने घट येत असून आज मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यात १५ हजार १४० रूग्ण आढळून आले आहेत. तर  ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४२% एवढे …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिले “हे” आदेश विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्यामागे एकादी शक्ती असावी

मराठी ई-बातम्या टीम आज दिवसभरात मुंबईसह राज्यातील नागपूर, उस्मानाबाद आणि औरंगाबादेत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या दोन्ही वर्गाच्या परिक्षा ऑनलाई घ्या किंवा परिक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अचानक विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्यामागे नेमका व्यक्ती कोण असा प्रश्न राज्य …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी संमती नसल्याचे सांगावे अन्यथा त्यांच्याविरोधातही याचिका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम पीठासीन अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केलेल्या भाजपाच्या १२ आमदारांवरील कारवाई सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी केली. त्यामुळे या दोघांनी केलेल्या टिप्पणीशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली संमती नसल्याचे सांगावे अन्यथा त्यांच्या विरोधातही न्यायालयात अवमान …

Read More »

आढळून आलेल्या रूग्णांहून ९८ टक्के जास्त बरे होवून घरी ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद तर फक्त ५ ओमायक्रॉन बाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असून आजही २२ हजार ४४४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर ३९ हजार १५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१४% एवढे झाले आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अॅड.शेलार म्हणाले, “सत्य परेशान…” याचिकाकर्ते भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाचे आभार, आम्हाला न्याय मिळाला. या निर्णयाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नाही” अशी प्रतिक्रिया १२ आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे निलंबित भाजपा आमदार अॅड.आशिष शेलार यांनी व्यक्त करत तीन न्यायाधीशांच्या पीठानं महाविकास आघाडी सरकारचा हुकुमशाही निर्णय …

Read More »

कोरोनाबाधित आढळून आलेल्यांपेक्षा बरे होणारे जास्त: ओमायक्रॉनही आढळून आले २५ हजार नवे बाधित तर ३६ हजार बरे होवून घरी गेले

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज नव्याने कोरोनाबाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली असून आढळून येणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. आज ३६,७०८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३२% एवढे झाले आहे. तर राज्यात २५,४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कंत्राटी नियुक्त्यांसाठी सुधारित कार्यपद्धती

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देण्याच्या सुधारित कार्यपद्धतीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे बिगर सेवानिवृत्त डॉक्टरांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देता येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील …

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० धोरणाची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील …

Read More »