Breaking News

१५ हजार नवे बाधित तर ३५ हजार बरे होवून घरी गेले: ९१ ओमायक्रॉन रूग्ण ३९ बाधितांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम

मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत सातत्याने घट येत असून आज मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यात १५ हजार १४० रूग्ण आढळून आले आहेत. तर  ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४२% एवढे झाले आहे. त्याचबरोबर राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४६ लाख २९ हजार ४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ लाख २१ हजार १०९ (१०.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात ११,७४,८२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ९१ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. ओमायक्रॉनबाधित रूग्ण नागपूर -१८, औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबई मनपा- प्रत्येकी ११, मुंबई आणि ठाणे मनपा – प्रत्येकी ८, सिंधुदुर्ग आणि सातारा- प्रत्येकी ५, अमरावती, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे मनपा- प्रत्येकी ४, यवतमाळ आणि पुणे ग्रामीण- प्रत्येकी १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९६० १०४५६७२ ११ १६६२३
ठाणे ८२ ११७२१२ २२५५
ठाणे मनपा १८७ १८७४२४ २१३५
नवी मुंबई मनपा ३२४ १६४३२७ २०५२
कल्याण डोंबवली मनपा ६६ १७५१५६ २९२३
उल्हासनगर मनपा २६२५८ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३०५५ ४९१
मीरा भाईंदर मनपा ४० ७६१६७ १२१८
पालघर ६३६५१ १२३७
१० वसईविरार मनपा ४१ ९८४३० २१३५
११ रायगड १६२ १३६४६१ ३४२२
१२ पनवेल मनपा १९१ १०४७०९ १४५८
ठाणे मंडळ एकूण २०६८ २२०८५२२ २६ ३६६१५
१३ नाशिक ७२० १७९५९७ ३७८४
१४ नाशिक मनपा ६५२ २७३६४८ ४७०२
१५ मालेगाव मनपा १९ १०९३६ ३३८
१६ अहमदनगर ८८६ २८८५८५ ५५४९
१७ अहमदनगर मनपा ५३४ ७७८९२ १६४१
१८ धुळे २७८५३ ३६३
१९ धुळे मनपा २१९८६ २९५
२० जळगाव २२८ ११२५३७ २०६२
२१ जळगाव मनपा ३७ ३५२६२ ६५९
२२ नंदूरबार ४४८६३ ९५१
नाशिक मंडळ एकूण ३०९४ १०७३१५९ २०३४४
२३ पुणे ६९३ ४१५८६५ ७०७२
२४ पुणे मनपा २०९४ ६५७११३ ९३४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८७४ ३३६९४८ ३५५३
२६ सोलापूर १६८ १८७३३२ ४१६७
२७ सोलापूर मनपा ५४ ३६३८५ १४९४
२८ सातारा ५२५ २७४२११ ६५७९
पुणे मंडळ एकूण ४४०८ १९०७८५४ ३२२१४
२९ कोल्हापूर २०३ १६०६८१ ४५५४
३० कोल्हापूर मनपा १६९ ५७३९२ १३१३
३१ सांगली १६४ १७२५४३ ४२९२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ८९ ५१४३८ १३५३
३३ सिंधुदुर्ग १५२ ५६६४५ १४८७
३४ रत्नागिरी ५५ ८३६५८ २५१६
कोल्हापूर मंडळ एकूण ८३२ ५८२३५७ १५५१५
३५ औरंगाबाद १०० ६६५५४ १९३६
३६ औरंगाबाद मनपा २७६ १०५६७८ २३३१
३७ जालना २२५ ६५३२७ १२१९
३८ हिंगोली ३५३ २०८९१ ५०८
३९ परभणी ४५ ३७१२५ ७९४
४० परभणी मनपा ३१ २०४७९ ४४५
औरंगाबाद मंडळ एकूण १०३० ३१६०५४ ७२३३
४१ लातूर १२१ ७५२४५ १८१२
४२ लातूर मनपा ७२ २७८३४ ६४६
४३ उस्मानाबाद १३७ ७३३९१ २००१
४४ बीड १०८ १०७९८४ २८५१
४५ नांदेड १०१ ५११३९ १६३५
४६ नांदेड मनपा ९८ ५००३९ १०३८
लातूर मंडळ एकूण ६३७ ३८५६३२ ९९८३
४७ अकोला २७७०३ ६५६
४८ अकोला मनपा ५० ३७३६२ ७८२
४९ अमरावती ७३ ५४५४७ ९९०
५० अमरावती मनपा १४५ ४८०७८ ६१०
५१ यवतमाळ ९२ ८०५७४ १८०४
५२ बुलढाणा ७७ ८८४९० ८१४
५३ वाशिम १५१ ४४२६७ ६३७
अकोला मंडळ एकूण ५९१ ३८१०२१ ६२९३
५४ नागपूर ६७९ १४४८९३ ३०७५
५५ नागपूर मनपा १४४७ ४१५६५२ ६०५५
५६ वर्धा २४ ६३८४८ १२२५
५७ भंडारा ९७ ६५७८१ ११२८
५८ गोंदिया १३० ४४५६० ५७५
५९ चंद्रपूर २२ ६४४१३ १०९२
६० चंद्रपूर मनपा ३५ ३२९३४ ४७९
६१ गडचिरोली ४६ ३४२८५ ६७४
नागपूर एकूण २४८० ८६६३६६ १४३०३
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण १५१४० ७७२११०९ ३९ १४२६११

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *