Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

बाळासाहेब थोरातांची मागणी, कृषीमंत्र्यांचे विधान असंवेदनशील; मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या

राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक वाया गेले आहे. सोयबीन, कापूस, तूर, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी ४००-५०० रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात तात्काळ वाढ करा मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा

अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी दुर्गम ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी आरोग्य सेवा सांभाळण्याचे काम केले. पण त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. सरकारने तात्काळ त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना …

Read More »

बाळासाहेब थोरातांचा टोला, जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करत इतिहास घडवला धंगेकरांच्या कसबा पेठेतील विजयानंतर काँग्रेस नेते थोरात यांचा भाजपाला टोला

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात …

Read More »

नाना पटोले, थोरात, चव्हाण एकत्र येत म्हणाले,… आमच्यात कुठलाही वाद नाही काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा

भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहोचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेचे उमेदवार …

Read More »

दिल्लीतील खलबतानंतर “नाराज” बाळासाहेब थोरात म्हणाले, हे कोणी सांगितले ? मला माध्यमांकडूनच समजत होते

विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत राज्यातील पक्षनेतृत्व नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत दिल्लीतील श्रेष्ठींना पत्र पाठवून कल्पना दिल्याचे सांगितले. मात्र हा राजीनामा काँग्रेसने नामंजूर केला. त्यानंतर …

Read More »

अजित पवारांनी पुन्हा केला गौप्यस्फोट, बाळासाहेब थोरातांनी दिला गटनेते पदाचा राजीनामा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना थोरातांना विचारल्यानंतर त्यांनीच माहिती दिल्याचा केला दावा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला असून सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीवरून आणि सत्यजीत तांबेच्या विजयाचे भाकित करणारे याशिवाय सत्यजीत तांबे हे भाजपासोबत जाणार नसल्याचे आणि शिवसेनेतील बंडाच्या माहितीचा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात …

Read More »

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर पहिल्यांदाच बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, हे पक्षिय राजकारण सत्यजीत तांबे चांगल्या मतांनी निवडूण आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणूकीतील इतर उमेदवारांच्या चर्चेपेक्षा सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची झाली. तांबे यांच्या बंडखोरीबाबत अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत केलेले वक्तव्य, त्यानंतर नाना पटोले यांचे वक्तव्यांच्या …

Read More »

सत्यजित तांबेंच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर, वेळेवर व योग्य असाच AB फॉर्म पाठवला सत्यजीत तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते ?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात …

Read More »

अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …

Read More »

सत्यजीत तांबेच्या उमेदवारीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट, मी आधीच सांगितले होते… बाळासाहेब थोरात यांच्याशी मी आधीच बोललो होतो

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षांतर्गत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असूनही त्यांनी ऐनवेळी आपला अर्जच दाखल केला नाही. तर मूळचे काँग्रेसचे नेते असलेले …

Read More »