Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

नाना पटोले यांचा संतप्त सवाल, सुरत पाकिस्तानात आहे का? सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक

काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा …

Read More »

संकल्प सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा, पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावेच लागेल राहुल गांधींवरील कारवाई दडपशाही व हुकूमशाहीचे उदाहरण, काँग्रेस अशा कारवाईला घाबरत नाही- पृथ्वीराज चव्हाण

राहुल गांधी यांनी अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा इशारा, जोडे जसे तुमच्याकडे तसेच आमच्याकडेही, विसरू नका तुमच्या काळात नव्या पायंड्याला सुरुवात करताय म्हणत विरोधकांचा सभात्याग

विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात होताच विधिमंडळ परिसरात आमदारांसाठी असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन कऱणारे कृत्य राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची आठवण महाविकास आघाडीच्या सदस्यांनी करून दिली. त्यानंतरही …

Read More »

इंदिरा गांधी यांचा संदर्भ देत काँग्रेस नेत्यांचे भाकीत, राहुलसुद्धा… पंतप्रधान होतील राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचे विधानसभेत पडसाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द …

Read More »

बाळासाहेब थोरातांचा पलटवार,…त्याच गावच्या बाभळी असतात’ हे सत्ताधा-यांनी लक्षात ठेवावे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन हे सत्ताधाऱ्यांचे हीन राजकारण

खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर केला, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतक-यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही. आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या …

Read More »

राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अध्यक्षांनीच सत्ताधाऱ्यांना भरला दम राहुल गांधी विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना आज सकाळीच २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी पक्षातील भाजपा-शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमा होत लंडनमधील सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी जोडे मारो आंदोलन सुरु केले. या घटनेचे …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा त्यांच्या वेतनाचा लाभही द्या

अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे …

Read More »

अजित पवारांनी शेतकरीप्रश्नी साद घालत म्हणाले, अध्यक्ष महोदय आदेश काढा त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग...

आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करून तात्काळ निर्णय करावा – जयंत पाटील सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला …

Read More »

छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या …

Read More »

‘मोदी-अदानी भाई भाई, देश बेचके खाई मलाई’च्या घोषणांनी गिरगाव चौपाटी दणाणली मोदी सरकार जास्त काळ सत्तेवर राहणे लोकशाहीला घातक, सरकार बरखास्त करा !: नाना पटोले

अदानी महाघोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने देशभरातील राजभवनावर मोर्चा काढला आहे. अदानी स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीतील पैसा लुटत होता त्यावेळी चौकीदार काय करत होता? हाच प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केला तर तो भागच सरकारने कामकाजातून काढून टाकला. मोदी सरकार …

Read More »