Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

सत्यजीत तांबे यांनी सांगितले कारण, का भरला अपक्ष उमेदवारी अर्ज राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर पत्रकारांनी ‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला …

Read More »

रूग्णालयातून बाळासाहेब थोरात यांनी मांडली अब्दुल सत्तारप्रकरणी सत्यता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आरोप खोटे व दिशाभूल करणारे

राज्याचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूखंड वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत दोषी ठरविले. त्यावरून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासागहेब थोरात यांच्यावर आरोप केले. सध्या दुखापतीमुळे मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयातून विखे-पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, कमी पटसंख्येच्या शाळांबाबत धोरण स्पष्ट करा दुर्गम आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय ?

युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका …

Read More »

शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे विमा कंपन्या व सरकारकडून शेतकऱ्याला तातडीने मदत मिळेल हे सुत्र सरकार ठेवणार का ? बाळासाहेब थोरात यांचा प्रश्न

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारच्या वतीने व पीकविमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु पीकवीमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना १०० रुपये, १२८ रुपयांचे धनादेश मिळाले आहेत, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून विमा कंपन्या व राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याला …

Read More »

अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात …

Read More »

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे पत्र..

काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी १४ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधीबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुल गांधी यांनीही त्या ऐकून घेतल्या. …

Read More »

भाजपा माफी मागा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही

भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच …

Read More »

पदयात्रेतील शिवसेनेच्या सहभागावर भाजपाची टीका अनावश्यक

कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुल गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, …भाजपावाले कोणत्या देशाचे देशभक्त?

नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी रात्री ८ वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेते खा. राहुल …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त …

Read More »