Breaking News

निवडणूकीचा असाही सोस,विवाहित तरूणाने शहरात लावले “बायको पाहिजे”चे बॅनर औरंगाबादेत पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तरूणाचे असेही धाडस

मराठी ई-बातम्या टीम

गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरूणांना सहज श्रीमंत आणि मान सन्मान मिळविण्यासाठी राजकिय क्षेत्राचे चांगलेच आकर्षण निर्माण झाले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांकडून स्वत:ला निवडणूक आयोगाच्या नियमात फिट बसण्यासाठी आणि पक्षाच्या पसंतीस उरण्यासाठी अनेक क्लृपत्या लढवित असताना अनेकदा पाहिले आहे. मात्र स्वत:ला लॉकडाऊन काळात मुल झाल्याने दुसऱ्या विवाहाच्या नावाखाली फक्त दोनच अपत्य असल्याचे दाखविण्यासाठी औरंगाबादेतील एका बहाद्दर पट्ट्याने एक अनोखीच शक्कल लढविली.

या तरूणाचे नाव रमेश पाटील यांनी शहरातील अनेक भागात पोस्टर लावत बायको पाहिजे अशी जाहिरात केली. विशेष म्हणजे या पट्ट्याने त्यासाठी खरंखरं कारणही त्या पोस्टरवर लिहून टाकलं की “मला तीन मुले असल्याने निवडणूक लढविता येत नाही” म्हणून वरून कोणत्या वयोगटातील बायको कशी पाहिजे याचे सविस्तर वर्णन आणि अपेक्षाही त्या बॅनरवर लिहून टाकल्या. त्यासाठी संपर्क साधण्यासाठी या रमेश पाटील पट्ट्याने स्वत:चा मोबाईल नंबरही बॅनरवर लिहून टाकला.

रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून सकाळपासून राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे हा बॅनरचा वाद वाढताना दिसून येत आहे.

रमेश पाटील यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. या बॅनरवरून आता भाजप आक्रमक झाले आहे, भाजपच्या महिलांनी हे बॅनर शाईफेक करत फाडलेच. आता राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळेच हा प्रकार समोर आला आहे.

रमेश पाटील यांच्या या बॅनरबाजीवरून तरूणांमधील वाढते राजकिय खुळ आणि त्यासाठीस काहीही करण्याची तयारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात यामुळे नवी समस्या तर निर्माण होणार नाही ना? अशी भीती समाजशास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *