Breaking News

किरीट सोमय्यांच्या टीकेला संजय राऊतांचे खोचक उत्तर, “नावावर करतो…” अमित शाहचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का?

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे अशोक गर्ग या व्यावसायिकाबरोबर भागीदारीत वायनरीचा बिझनेस असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमया यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी सोमयाांच्या आरोपाला खोचक उत्तर देत म्हणाले की, ते म्हणतायत त्याप्रमाणे आमची जर एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल, तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणं, चोऱ्या-माऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं कधीही चांगलं. पण भाजपाचे थोतांडी लोकं जे काही म्हणत आहेत, अशा काही वायनरीज आमच्या कुटुंबाच्या असतील तर नक्कीच मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार असल्याचा उपरोधिक टोला लगावत मला शरद पवारांनीही फोन केला होता, तेही हसत होते अशी माहिती देवून टाकली.

तसेच किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा उलट सवाल संजय राऊत यांनी विचारला.

संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातल्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसायात भागिदारी सुरू केली. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या वाईन उत्पादन ग्रुपसोबत करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता, उर्वशी या कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्याचा आरोप किरीट सोमयांनी केला.

अशोक गर्ग माझे मित्र आहेत. किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? भाजपा नेत्यांची मुलं केळी विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? कुणाची मुलं काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची मुलं वांद्र्याच्या किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल टाकणार आहेत का? की डान्सबार टाकणार आहेत नाचवायला? खोचक सवालही त्यांनी सोमयांना यावेळी केला.

भाजपाच्या लोकांनी हे धंदे बंद करावेत. महाराष्ट्रात भाजपाच्या लोकांनी जे घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे, ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कार, परंपरा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही घरादारापर्यंत, आमच्या मुलाबाळांपर्यंत जाता. तुमची मुलं काय करतात ते बघा. आमची मुलं तुमच्याप्रमाणे ड्रग्ज विकत नाहीत किंवा ड्रग्जच्या आहारी गेलेले नसल्याचा उपरोधिक टीकाही केली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *