Breaking News

अद्यापही पंतप्रधान मोदींना भीती कोरोनाची कोरोना चाचणी नसेल तर तुम्ही पंतप्रधानांच्या जवळपासही भटकू शकत नाही-एसपीजीचे तोंडी आदेश

कोरोना संक्रमणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारलेल्या चुकीच्या धोरणावर अद्यापही टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चुकिच्या धोरणावर आतापर्यंत तरी पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारने, भाजपाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र ज्या काळात कोरोना संक्रमणाच्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाच्या अनेक नेत्यांनी लाखोंच्या उपस्थितीत राजकिय सभा घेतल्या. तसेच कोरोना संक्रमणाचा काळ ओसरण्या आधीच आरटीपीआर चाचणीची अट शिथिल केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देशभरात कोरोना चाचणी बंधनकारक नसताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला किंवा स्वागताला जात असाल तर तुमची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असल्याचा अलिखित नियमच केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजूनही कोरोनाची भीती असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

एप्रिल-मे महिन्यात कोरोना संक्रमणावरून महाराष्ट्रात भाजपाने राजकिय उलथापालथी घडवून आणत महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले. त्यानंतर राज्य निर्बंध मुक्त आणि कोरोनामुक्त जगण्याचा नारा शिवसेनेतील बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर करत गर्दीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली. तसेच आरटीपीआर चाचणीच्या नियमात शिथिलता आणत आपतकालीन कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन टाकली.

मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजही कोरोनाची भीती वाटत असल्याचे स्पष्ट झाले असून विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जाणाऱ्या प्रशासकिय अधिकारी, राजकिय नेते आणि घटनात्मक पदावर असलेल्या राजकिय व्यक्तींना कोरोना चाचणी असणे बंधनकारक करण्यात आले. जर तुमची चाचणी नसेल तर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या एसपीजी सुरक्षा व्यवस्थेकडून लगेच बाजूला सारण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तसेच प्रत्येक वेळी पंतप्रधान दौऱ्याच्यावेळी एसपीजीचा एक अधिकारी त्या त्या दौऱ्याच्या ठिकाणी पोहोचतो आणि तेथील पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिली जाते. तसेच प्रत्येक दौऱ्यात एसपीजीची टीम आणि अधिकारी बदलण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा दौऱा असून मुंबईतील दुसरा दौरा आहे. मात्र प्रत्येक दौऱ्यात शासकिय संकेतानुसार हजर राहणारे घटनात्मक राजकीय पदावरील व्यक्ती, प्रशासकिय अधिकारी यांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश एसपीजीकडून दिले जातात. तसेच जर कोरोना चाचणी केली नसेल तर एसपीजीचे अधिकारी संबधित घटनात्मक राजकिय पदावर असलेल्या व्यक्ती आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांना प्रसंगी लगेच बाजूला सारत असल्याचेही अन्य एका अधिकाऱ्यांने सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *