Breaking News

डायव्हिंगमध्ये मेधालीचे स्वप्नवत सुवर्णपदक तर ऋतिकाला ब्रॉंझपदक ऋतिकाची पदकांची हॅट्रिक

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधाली रेडकर हिने डायव्हिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. तिची सहकारी ऋतिका श्रीराम हिने ब्रॉंझपदक पटकावित येथे तिसऱ्या पदकाची नोंद केली.

एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवीत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ती मुंबई येथे तुषार गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. व्यवसायाने फिजिओ असलेल्या या खेळाडूने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके जिंकली आहेत.

सुवर्णपदक मिळवल्यानंतर तिने सांगितले, “आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर मला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे आज येथे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय होते आणि मी सर्वोच्च कौशल्य दाखविले. राष्ट्रीय स्तरावर पहिले सुवर्णपदक मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हे सुवर्णपदक माझ्या भावी करिअरसाठी प्रेरणादायकच आहे.”

ऋतिकाची पदकांची हॅट्रिक
ऋतिका श्रीराम हिने येथे पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने याआधी या स्पर्धेत तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड व हाय बोर्ड प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. तिचे पती आणि आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू हरी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे. तिला दोन वर्षाचा मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर तिने पुन्हा सराव सुरू केला आणि अनेक स्पर्धांमध्ये भरपूर यश मिळविले आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *