Breaking News

राहुल गांधींच्या “७० साल” वाला काटछाट व्हिडिओप्रकरणी सायबर तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता शेअर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीचा फायदा उठवित भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाच्या मूळ व्हीडीओत काटछाट करत चुकीचा व्हीडीओ व्हायरल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी शेअर केला. तसेच या काटछाट केलेल्या व्हीडीओचा वापर राजकिय कारणासाठी केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या ४० सेंकदाच्या व्हीडीओमध्ये राहुल गांधी यांनी ७० साल मे कुछ नही भी नही हुऑ…देख लिया असे म्हणताना दाखविले आहे. मात्र मूल व्हीडीओमध्ये ७० वर्षात काँग्रेसने काय केले याचा लेखाजोखा मांडत मागील पाच वर्षात मोदी सरकारने काय केले याचा आलेख मांडत भाजप सरकारवर टीका केली होती.
त्यामुळे मूळ व्हीडीओत काटछाट करून विकृत उद्देशाने हा व्हीडीओ व्हायरल केल्याची तक्रार साकेत यांनी सायबर क्राईमकडे केली आहे. तसेच या व्हीडीओप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *