Breaking News

सुर्यकिरणांच्या अभ्यासासाठी इस्रोचे यान नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झेपावले

मागील वर्षी चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोने सुर्य ग्रहातून फेकल्या जाणाऱ्या उर्जेची अर्थात सुर्यकिरणांच्या अभ्यासासाठी सुर्यकिरणे आणि धृव्रावरील ब्लँक होलचा अभ्यास करण्यासाठी यान पाठणविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी इस्रोने आपले एक्सपो सॅट याना अवकाशात झेपावले.

सकाळी यानाने अवकाशात झेप घेतल्यानंतर यान सुरक्षितरित्या इच्छितस्थळी पोहोचत असल्याचे ट्विट इस्रोने आपल्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर दिली आहे. तसेच जवळपास ८ तास उलटून गेले तरी या यानाची प्रकृती उत्तम असल्याचेही स्पष्ट केले.

अंतराळात सुर्य या ग्रहापासून एका सुरक्षित अंतरावर हे यान थांबणार असून सुर्य किरण पृथ्वीवर पोहोचत असताना नेमकी कशा पध्दतीने ती पोहत असतात तशी ही किरणे निर्माण कशी होतात याचा अभ्यास या यानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवास अंतराळात विश्वास अनेकदा एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहाची निर्मिती होत असते. त्यावेळी काही किरणे बाहेर पडत असतात त्यावेळी निर्माण होणाऱ्या किरणांचा अभ्यास या यानाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

याशिवाय अवकाशात काही ब्लॅक होल्स म्हणून काही भाग ओळखला जातो. या ब्लॅक होल्सचा अभ्यासही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे हे यान तयार करताना देशातील स्टार्टअप, काही शैक्षणिक संस्था, इस्रोने तयार केलेल्या १० प्लेलोडचा वापरही करण्यात आला आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *