Breaking News

डिसेंबर तिमाहीत घट तर वार्षिक जीएसटी कर संकलनात १० टक्क्याने वाढ

मागील काही वर्षात कोविड काळ आणि वाढती महागाई, बेरोजगारी या पार्श्वभूमीवर जनतेकडील खर्च करण्यासाठी क्रयशक्ती नसल्याने देशाच्या तिजोरीत गतवर्षीप्रमाणे याही वर्षात जीसटी कलेक्शनची भर पडणार की नाही याबाबत संशय निर्माण झाला होता. तरीही नुकत्यास संपलेल्या तिमाही अर्थात डिसेंबरच्या अखेरपर्यंत जीएसटी कर संकलनात घट झाली असली तरी वार्षिक कर संकलनात १० टक्क्याने वाढ होत १.६४ कोटी रूपयांची भर केंद्राच्या तिजोरीत पडली आहे. तसेच जीएसटी रकमेत नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत चांगलीच घट झाल्याची माहिती जीएसटी कार्यालयाने दिलेल्या माहितीतून पुढे आली आहे.

२०२३ च्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जीएसटी कलेक्शनमध्ये १२ टक्के वाढ झाल्याचे दिसत १४.९७ लाख कोटी रूपयांचे संकलन झाले होते. तर त्यापूर्वीच्या २०२२ या वर्षी १३. ४ लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.

सर्वसाधारणपणे पाहिले तर तुलनात्मकदृष्ट्या महिन्यांच्या हिशोबाने पाहिले तर २०२४ च्या पहिल्या आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यात १.६६ लाख कोटी रूपयांचे जीएसटी कर संकलन झाल्याचे दिसून येते. तर गतवर्षीच्या अर्थात २०२३ च्या आर्थिक वर्षात १.४९ लाख कोटी रूपयांचे कर संकलन झाले होते. या दोन्ही आर्थिक वर्षातील जीएसटी कर संकलन पाहिले तर यंदाच्या वर्षात १.६६ लाख कोटी रकमेत १२ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

२०२३ च्या डिसेंबर अखेर पर्यंत १, ६४, ८८२ कोटी रूपयांचे कर संकलन झाले होते. यातील सीजीएसटी ३० हजार ४४४ तर आयजीएसटी ८४ हजार ८४ हजार २५५ आणि एसजीएसटी ३७ हजार ९२५ इतका जमा झाला होता. यात आयात केलेल्या मालावरील ४१ हजार ५३४ कोटी रूपयांचा जीएसटी करही धरण्यात आलेला आहे. तसेच सेसमधून १२ हजार २४९ कोटी रूपयांचे जीएसटी करही जमा झाला आहे.

कोटी रूपयांचे कर संकलन झाले होते. यातील सीजीएसटी ३० हजार ४४४ तर आयजीएसटी ८४ हजार ८४ हजार २५५ आणि एसजीएसटी ३७ हजार ९२५ इतका जमा झाला होता. यात आयात केलेल्या मालावरील ४१ हजार ५३४ कोटी रूपयांचा जीएसटी करही धरण्यात आलेला आहे. तसेच सेसमधून १२ हजार २४९ कोटी रूपयांचे जीएसटी करही जमा झाला आहे.

Check Also

इंडिगो, जगातील तिसऱ्या क्रमांकांची विमान कंपनी बनली भारतातील सर्वात मोठी एअरलाइन

इंडिगो विमान कंपनीने बुधवारी बाजार भांडवलाच्या बाबतीत यूएस-आधारित साउथवेस्ट एअरलाइन्सला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *