Breaking News

पर्यटन प्रेमींसाठी खुशखबर, ‘या’ देशात करा विना व्हिसा प्रवास या देशात विना व्हिजा करता येणार प्रवास

पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, जर तुम्ही दिवाळी सुट्टीमध्ये थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. येत्या काही दिवसांसाठी भारतीयांना थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. याचा फायदा अनेक पर्यटन प्रेमींना होणार असून थायलंडला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे.

थाई सरकारने नवीन धोरण आखले असून, थाई टुरिझमनुसार, तुम्ही १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ या कालावधीत व्हिसाशिवाय थायलंडला जाऊ शकता. या कालावधीत पर्यटक तेथे ३० दिवस राहू शकतात. थाई टुरिझमने भारत आणि तैवानमधील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, यापूर्वी सप्टेंबर महिन्यात थायलंडनेही चीनी पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.

दरम्यान, यापूर्वी श्रीलंकेने सुद्धा ३१ मार्च २०२४ पर्यंत भारतीय पर्यटकांना व्हिसा मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली होती. थायलंडपूर्वी श्रीलंकेनेही भारतीय पर्यटकांना आनंदाची बातमी दिली होती. मात्र, श्रीलंकेने भारत, चीन आणि रशियासह ७ देशांतील पर्यटकांना व्हिसा फ्री एन्ट्री जाहीर केली होती. कोरोनाच्या कालावधीनंतर अनेक देश भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने सुविधा देत आहेत. यामुळे याचा फायदा हा पर्यटक प्रेमींना निश्तितच होणार आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *