Breaking News

अखेर सत्ताधारी सहयोगी पक्षांच्या आमदारांनीच मंत्रालयाला ठोकले टाळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि दादा भूसे यांच्य गाड्या फोडल्या

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्यावरून वातावरण चांगलेच तप्त झालेले आहे. तसेच अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदी केल्याने त्याचा फटका या आमदारांना बसला आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या, अजित पवार गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांसह काँग्रेसच्या काही आमदारांनी आज सकाळी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे टोकले. मात्र कालांतराने पोलिसांनी आमदारांनी ठोकलेले टाळे काढून टाकले.

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून राजकिय पुढाऱ्यांना गावबंदीची घोषणा केली. त्यानंतर बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात. त्यामुळे गावबंदीचा आणि जाळपोळींच्या घटनांचा फटका सर्वच आमदारांना विशेषत फुटीरतावादी गटाच्या आमदारांना बसू शकतो. त्यामुळे फुटीरवादी गटाच्या काही आमदारांनी सुरुवातीला विधान भवनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरीता आंदोलन केले.

त्यानंतर मंत्रालयात येत मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळे टोकत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी करत काही काळ घोषणाबाजी केली. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप बनकर, ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील, राजू नवघरे, काँग्रेस-नांदेड जिल्ह्यातील आमदार मोहन हंबर्डे, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके, ठाकरे गटाचे आमदार धाराशीवचे कैलास पाटील, नाशिकचे अपक्ष आमदार माणिकराव कोकाटे, तसेच सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील, आमदार चेतन तुपे आदींचा सहभाग होता.

दरम्यान या आमदार आणि त्यांच्या सोबतच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर पोहोचलेल्या वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री दादा भुसे यांच्या गाडीवर हल्लाबोल केला. यात या दोन्ही मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि काही किरकोळ नुकसान झाले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, चंदिगढ महापौर निवडणूकीतील बॅलेट पेपर दाखवा

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मते अधिक असतानाही चंदिगढ महापौर निवडणूकीत अल्पमतात असणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *