Breaking News

आजपर्यंतचा जीएसटी संकलनात दुसरा उच्चांक ऑक्टोबरमध्ये १.७२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

गेल्या महिन्यात व्यवसाय आघाडीवर सरकारसाठी एक मोठी दिलासादायक बातमी होती. ऑक्टोबर महिन्यात सरकारने १.७२ लाख कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा केला. हा आकडा वार्षिक आधारावर सुमारे १३ टक्के अधिक आहे आणि आजपर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन होते. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये जीएसटीची विक्रमी रक्कम जमा झाली होती.

अर्थ मंत्रालयाने बुधवारी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली. सलग आठव्या महिन्यात १.५ लाख कोटींहून अधिकजीएसटी जमा झाला. ऑक्टोबरमध्ये १.६७ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला. यामध्ये केंद्रीय जीएसटी ३०,०६२ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३८.१७१ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी ९१,३१५ कोटी रुपये आहे. याशिवाय नुकसान भरपाई उपकर १२,४५६ कोटी रुपये आहे. ऑक्टोबरमध्ये, एकात्मिक जीएसटीपैकी केंद्रीय जीएसटीमध्ये ४२,८७३ कोटी रुपये आणि राज्य जीएसटीमध्ये ३६,६१४ कोटी रुपये जमा झाले. अशा स्थितीत अखेर ऑक्टोबरमध्ये केंद्रीय जीएसटी ७२,९३४ कोटी रुपये आणि राज्य जीएसटी ७४,७८५ कोटी रुपये होता.

एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या विक्रमी जीएसटी संकलनाच्या आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आतापर्यंत, दरमहा सरासरी १.६६ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे, जो वार्षिक आधारावर ११ टक्के आहे. या आकडेवारीत सातत्याने सुधारणा होत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात सरासरी १ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. कोरोना महामारीनंतर जीएसटी संकलन झपाट्याने वाढले आणि २०२२-२३ मध्ये सरासरी मासिक जीएसटी संकलन १.५१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हा आकडा १,६६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या आर्थिक वर्षात १२ टक्के अधिक जीएसटी संकलनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *