Breaking News

फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे मुलांमध्ये वाढतय डिप्रेशनच; थेट अमेरिकेत नागरिकांची तक्रार दाखल अमेरिकेतील नागरिकांनी थेट फेसबुक आणि इंस्टाग्राम विरोधात दाखल केली तक्रार

फेसबुक आताची ‘मेटा’ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जगभरात वेगाने विस्तार करत आहे. जगभरात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दिवसभर फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखी डिजिटल माध्यम वापरत असतात. मात्र ही बाब मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे.

मेटाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण पिढी डिप्रेशनमध्ये जात आहेत. म्हणूनच अलीकडे अमेरिकन राज्यांनी यावर कठोर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसह ३३ यूएस राज्यांनी, ‘जाणूनबुजून तरुणांना हानी पोहोचवल्याबद्दल’ आणि ‘इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुकवर मुलांना या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करणारी फीचर्स जाणूनबुजून डिझाइन करून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम केल्याबद्दल’, मेटावर खटला दाखल केला आहे.

३३ राज्यांच्या वतीने कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात दावा केला आहे की, मेटा फेडरल कायद्याचे उल्लंघन करून पालकांच्या संमतीशिवाय १३ वर्षाखालील मुलांकडून डेटा नियमितपणे गोळा करत आहे. याशिवाय नऊ अॅटर्नी जनरल आपापल्या राज्यात खटले दाखल करत असून, एकूण कारवाई करणाऱ्या राज्यांची संख्या ४१ वर पोहोचली आहे.

या खटल्यात असे म्हंटले आहे की, मेटाने तरुण आणि किशोरांना आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जास्तीत जास्त नफा मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. मेटाने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या महत्त्वपूर्ण जोखमींबद्दल वारंवार जनतेची दिशाभूल केली आहे. या प्लॅटफॉर्मने किशोर आणि मुलांचे शोषण आणि हेरफेर करण्याचे मार्ग लपवले आहेत. या खटल्याद्वारे आर्थिक नुकसान भरपाई आणि मेटाच्या कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या पद्धती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *