Breaking News

Birthday Boy कोहलीची शतकी खेळी, द. आफ्रिके समोर ३५६ धावांचे आव्हान सचिन तेंडूलकरच्या एक दिवसीय शतकी विक्रमाची बरोबरी

विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताची लढत दक्षिण आफ्रिकेसोबत सुरुवात झाली. Birthday Boy विराट कोहली याचा आज ३५ वा वाढदिवस असून आजच्या सामन्यात शुभमन गील याच्याबरोबरच्या भागीदारीत विराट कोहलीने पहिल्या ४.३ षटकातच ५० धावसंख्या बनविली. विशेष म्हणजे सामन्याच्या सुरुवातीला विराट कोहली मैदानावर आल्यानंतर त्याला सुरुवातीला बँटींगचा सूर सापडत नव्हता. मात्र नंतर त्याला सूर सापडला आणि ४.३ गीलबरोबरच्या भागीदारीत सुरुवातीला चाचपडणाऱ्या कोहलीने नंतर मात्र आपल्या शतकी खेळीने भारताची धावसंख्या ५ बाद ३५६ वर नेण्याच्या कामाचा पाया रचला. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या या शतकी खेळीमुळे त्याने एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडूलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली.

रोहित शर्मा याने २४ बॉलमध्ये ४० धावसंख्या देत शुभमन गीलबरोबरच्या भागीदारीत ६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रोटेसच्या बॉलिंगवर या दोघांच्या जोडगोळीने १५ षटकात १०५ धावसंख्या केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर विरोट कोहली हा मैदानावर आला. त्याने आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरच्या चेंडूवर सिक्सवर सिक्स मारत ४.३ षटकात ५० इतकी धावसंख्या उभारली. त्यानंतर विराट कोहलीने सतत आपला खेळ दाखवित शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील ४९ व्या सामन्यात सचिन तेंडूलकर याच्या विक्रमाशी बरोबरी करत त्याचा विक्रम मोडला.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगीसो राबडा यानेच विरोट कोहली याला झेल बाद केले. विराट कोहलीने शतक झळकाविल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या जागेवर उभे राहुन त्याच्या खेळाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. विराट कोहलीनेही चाहत्याचे अभिवादन हेल्मेट काढत आणि बॅट उंचावून स्विकारले.

त्यानंतर श्रेयस अय्यर यानेही आपला खेळ दाखवत देशाची धावसंख्या वाढविण्यास मदत केली. दिवस अखेर भारत ५ बाद ३५६ असे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभे केले. वास्तविक पाहता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही देश उपांत्य पूर्व फेरीसाठी आधीच निवडले गेले आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

इंस्टाग्राम मध्ये व्हाट्सअप सारखेच फिचर!

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *