Breaking News

मध्य प्रदेशात हवाई दलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर सुखोई-३० आणि मिराज-२००० विमानांची झाली धडक

मागील काही दिवसांमध्ये सुखोई-३० विमानांच्या अपघाताच्या घटनांची मालिकाच सुरु झाली होती. मात्र आज मध्य प्रदेशात सुखोई-३० आणि मिराज-२००० या हवाई दलाच्या विमानांची हवेतच टक्कर होऊन मोठी दुर्घटना मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुर्घटना घडताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील मोरेना येथे सुखोई-३० आणि मिराज २००० ही हवाई दलाची दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. सुखोई-३० मध्ये २ वैमानिक आणि मिराज २००० मध्ये एक वैमानिक होता, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही विमानांची हवेत धडक झाली की नाही, याची हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांच्याकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेत आहेत, असं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले.

राजस्थानमधील भरतपूरमध्ये भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं आहे. येथील पिंगोरी रेल्वे स्टेशनजवळ हे विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. या विमानाने आग्र्याहून उड्डाण केलं होतं. पण, भरतपूरजवळ आल्यावर कोसळलं. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघाताची हवाई दलाने कोणतीही माहिती दिली नाही.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *