Breaking News

क्रांती रेडकरांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना खुले पत्र, मराठीची घातली साद… शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे वाढले

मुंबईः प्रतिनिधी
दिवसेंदिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्य पध्दतीबाबत आणि त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून रोज नवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर पती समीरच्या बचावासाठी क्रांती रेडकर यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले पत्र लिहीत न्याय देण्याची मागणी केली.
लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठे झालेली मी एक मराठी मुलगी आहे…छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्याचा आदर्श घेवूनच मी वाढले…कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे ह्या दोघांनी शिकवलं. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे….लढते आहे…असे पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न रेडकर यांनी केला.
आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं…एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबियावर होणारे हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. ….म्हणून मी एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपक्षेने पाहतेय..तुम्ही योग्य तो न्याय करा अशी भावनिक साद करत मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

क्रांती रेडकरने मुख्यमंत्र्याना लिहिलेले हेच ते पत्रः-

Check Also

अनिल देशमुख आणखी १४ दिवस तुरूंगात विशेष न्यायालयाने सुणावली न्यायालयीन कोठडी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या ५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *