Breaking News

विजय वडेट्टीवार यांच्या धमकावता…प्रश्नावर, मंत्री केसरकर म्हणाले, दोन महिन्यात… अहो तुमचे संकेतस्थळच बंद आहे

राज्यात शिक्षकांच्या रिक्त पदभरतीबाबत एका उमेदवाराने तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्या उमेदवाराला थेट धमकाविता आणि संकेतस्थळ तपासायला सांगता. तुमचे मंत्री म्हणून असलेले धमकीप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अहो तुमची वेबसाईट अजूनही बंद आहे जरा तपासून पहा मग उमेदवारांना धमकी द्या असा खोचक सल्ला विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना विचारला.

नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर शालेय शिक्षक भरतीचा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी भरतीची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे जाहिर केले.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी शाळेतील रिक्त शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित करत शाळांच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यींची गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शाळांपासून दूर होत असलेली मुले पुन्हा आणण्यात सरकारने काय योजना केल्या यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला.

त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, १७ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात १६२४ मुले व १५९० मुली असे एकूण ३२१४ बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व ३५६ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी २९७ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये ३८ बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये ९२८ बालके शाळाबाहय आढळून आले. सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये ७१ बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर ९४ अशी एकूण १६५ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत ७६३ बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सांगितले.

तसेच राज्यात विशेषत: पालघर, ठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, शिक्षक पद भरतीबाबत शासनाने सुरु केलेले संकेतस्थळ बंद असल्याबाबत थेट उमेदवार शिक्षकांने तुम्हाला प्रश्न विचारला की शिक्षक भरतीची प्रक्रिया कधी तुम्ही पूर्ण करताय. तर सदर उमेदवार शिक्षकेला तुम्ही धमकाविता आणि अपात्र ठरविण्याची धमकी देताना तुम्हाला अख्या महाराष्ट्राने पाहिले. पण तुम्ही त्या शिक्षिकेच्या सांगण्यानुसार संकेतस्थळ सुरु आहे की बंद आहे याची अद्याप खातरजमा केली नाही. अहो मंत्री महोदय तुमचे संकेतस्थळ अद्यापही बंदच आहे. मग भरतीची प्रक्रिया कधी पूर्ण करणार असा सवाल केला.

त्यावर दीपक केसरकर म्हणाले, राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *