Breaking News

महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा? मतदार नोंदणी करा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक तारखांचा खेळ थांबवला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महापालिका आपले निवडणुकांचे काम पार पाडत आहे. अशातच ज्या नागरिकांचे मतदार यादीत नाव नाही, त्यानं देखील मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. नागरीकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. दुबार मतदार नोंद झालेली किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुणेकरांना शेवटचे १२ दिवस संधी असणार आहे. पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेंतर्गत २४ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदारांचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग किंवा भाग यांची गरजेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांच्या पूनर्रचना करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येणार आहे.

२५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरवणी आणि एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. तर, आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून २०१७ च्या तुलनेत २०२२ च्या निवडणूकीसाठी तब्बल ८ लाख २३ हजार ९१६ मतदार पुणे महापालिका निवडणुकीसाठी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदार म्हणून नोंदणी कशी कराल? वाचा…
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे https://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा वोटर्स हेल्पलाईन या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा,पत्ता बदलण्यासाठी आठ -अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा,असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

Check Also

राहुल गांधी यांचा रायबरेलीतूनही अर्ज दाखल, तर अमेठीतून के एल शर्मा

यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी उमेदवारी अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *