Breaking News

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक दोन्ही पवारांच्या बैठकींने राजकिय वर्तुळात चर्चेने उधाण

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते. तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या निमित्तानं पुण्यात राजकीय घडामोडी वाढणार असा अंदाज होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोरेगाव पार्क येथील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यामध्ये बैठक झाली अशा चर्चा आहेत. कोरेगाव पार्क मधील बंगला क्रमांक ७३ मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं बोललं जातंय. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, ज्यांच्या घरी भेट झाल्याची चर्चा आहे त्या अतुल चोरडिया यांनी या भेटीचं वृत्त फेटाळलं आहे.
चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार सर्किट हाऊस या ठिकाणी आले. त्यानंतर सरकारी ताफा त्याच ठिकाणी ठेऊन अजित पवार खासगी वाहनाने कोरेगाव पार्क याठिकाणी पोहचले, अशी सूत्रांची माहिती आहे.

शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बैठक मधेच सोडून निघाले होते. यावेळी जयंत पाटील हे देखील बैठकीमधून बाहेर पडत शरद पवार यांच्यासोबत निघाले होते, अशी माहिती देखील समोर येत आहे..

राजेश टोपे, जयंत पाटील, शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या च्या बैठकीत बसलेले होते. त्यानंतर शरद पवार आणि
जयंत पाटील बैठकीतून निघाले. यादरम्यान राजेश टोपे हे देखील बैठकीतून निघून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याजवळ आले. त्यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर पवार आणि पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून रवाना झाले आणि राजेश टोपे हे बैठकीसाठी थांबले, अशी माहिती आहे.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त बैठक हि उद्योगपती चोरडीया यांच्या बंगल्यावर झाल्याचं वृत्त असून ही बैठक तब्बल चार ते पाच तास चालल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र दोन्ही गटांनी अद्याप फेटाळलेलं नाही किंवा त्यावर भाष्य देखील केलेलं नाही.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांची मागणी,… संकटात असलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करा

अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *