Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत उद्या बैठक मान्यता प्राप्त संघटना होणार सहभागी

मुंबई: प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वेतन निश्चितीबाबत निर्णय 

सरकारने पगारवाढ दिल्यानंतर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा आक्रमक पवित्रा संपकऱ्यांनी घेतला आहे. एसटी सेवेला ब्रेक लागल्याने कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने दिलेल्या वेतनवाढ प्रस्तावावर कर्मचारी संघटनांनी हरकत घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि मान्यता प्राप्त कर्मचारी संघटनांची गुरुवारी बैठक बोलावली आहे. वेतन निश्चित आणि त्यातील तफावतींबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. कर्मचारी या बैठकीनंतर संप मागे घेतील का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

विलीनीकरणावर ठाम

वेतनवाढ, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचे नेतृत्व अनेक राजकीय पक्षांवर स्वार झाल्याने दिवसेंदिवस संपाचा तिढा वाढला. शिवाय, विलीनीकरणाच्या मागणीवरुन संप देखील चिघळला आहे. २५० डेपो बंद ठेवण्यात आले. तसेच मागील २२ दिवसांपासून कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. मात्र, राज्य शासनाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने बहुतांश कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. परंतु, राज्यभरात एसटी सेवा अद्याप पूर्वपदावर आली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे खासगी वाहतूक दारांकडून प्रवाशांची लूट सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *