Breaking News

कुस्तीपटूंच्या लढ्याला यश, क्रिडा मंत्रालयाकडून संजय सिंग यांची निवड बरखास्त

देशाच्या अभिमान आणि गर्वांत भर घालणाऱ्या हरियाणाच्या कुस्ती पटू साक्षी मलिक, विनेश फोगाट. बजरंग पुनिया आणि विरेंद्र सिंह यांनी लैंगिक शोषणाचे आरोप करत पुरस्कार वापसीचे आंदोलन सुरु केले. तसेच अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सरण सिंह आणि विद्यमान अध्यक्ष संजय सिंह यांच्या निवडीवरून सत्ताधारी भाजपा काहीच केले नाही म्हणून केंद्र सरकारलाही यात ओढले. त्यामुळे अखेर युवक आणि क्रिडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत निवडूण आलेल्या संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

ब्रिजभूषण सरण सिंह यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप १९ महिला कुस्ती पटूंनी केला होता. तसेच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करावी म्हणून कुस्ती पटू आणि पदक विजेती साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यासह अनेक महिला कुस्तीपटूंनी जतंरमंतर येथे तब्बल ४० दिवस आंदोलन केले. परंतु केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी खासदार तथा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही काहीच केले नाही. मात्र कुस्ती महासंघाची जूनी समिती बरखास्त करत निवडणूक जाहीर केली. परंतु त्या निवडणूकीत ब्रिजभूषम सरण सिंह यांचे मित्र आणि व्यावसायिक भागिदार संजय सिंह हे विजयी झाले. त्यानंतर साक्षी मलिक यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय सिंह यांच्यावरही लैगिक शोषणाचे आरोप आहेत, सरकार जर काही करणार नाही तर आपण कुस्ती कधीच खेळणार नसल्याचे जाहिर केले. त्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विरेंद्र सिंह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत आपणही राष्ट्रीय सन्मान पुरस्कार परत करत असल्याचे जाहिर केले.

या घटनेनंतर प्रसारमाध्यमांकडून आणि राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर केंद्रातील भाजपा सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. त्यामुळे केंद्रीय युवक आणि क्रिडा मंत्री मंत्रालयाने अखिल भारतीय कुस्ती महासंघाची संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील नवी समितीही बरखास्त करण्याचा निर्णय जाहिर केला.

नुकतेच अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे विद्यमान अध्यक्ष संजय सिंह यांनी महासंघाच्या अध्यक्ष पदी निवडूण आल्यानंतर तरूण महिला कुस्तीपटूंची राष्ट्रीय स्पर्धा ब्रिजभूषण सरण सिंह यांच्या मतदारसंघातील नंदीनी नगर गोंधा येथे आयोजित केली होती. त्यावर साक्षी मलिक यांनी जाणीवपूर्वक ही स्पर्धा ब्रिजभूषण सरण सिंह यांच्या प्रभावक्षेत्रात आयोजित केली असल्याचा आरोप करत केवळ महिला कुस्ती पटूंवर दबाव टाकण्यासाठीच नवे अध्यक्ष संजय सिंग यांनी तेथे राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, क्रिडा मंत्रालयाने जाहिर केलेल्या संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील समिती बरखास्त करताना कुस्ती स्पर्धा आयोजित करताना योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले नसल्याचा ठपका मंत्रालयाने ठेवला.

त्याचबरोबर कनिष्ठ कुस्तीपटूंच्या स्पर्धा या वर्षाच्या समाप्ती पु्र्वी होतील असे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह यांनी २१ डिसेंबर रोजी जाहिर केले होते. त्यावरही क्रिडा मंत्रालयाने आक्षेप घेतला असून स्पर्धेपूर्वी खेळाडूंना १५ दिवसांची तयारीसाठी मुदत देणे आवश्यक आहे. पण नव्या समितीने फक्त सात दिवसांची मुदत खेळाडूंना तयारीसाठी दिली. हा निर्णयही बेकायदेशीर असल्याचे सांगत स्पर्धेबाबतचा निर्णय कार्यकारी समितीत घेतले पाहिजे पाहिजेत, आधी अजेंडा विचारात घेतला पाहिजे. याशिवाय समितीच्या बैठकीसाठी १५ दिवस आधी सर्व सदस्यांना सूचना दिली पाहिजे,

बैठकीसाठी किमान एक तृतीयांश सदस्य उपस्थित राहिले पाहिजे असे स्पष्ट करत यातील कोणत्याच गोष्टींचे पालन केले गेले नाही. त्यामुळे नवी समिती बरखास्त करण्यात आल्याची घोषणा क्रिडा मंत्रालयाने केली.

याशिवाय अखिल भारतीय कुस्ती महासंघाचा कारभार जून्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यातून चालविला जात आहे. त्या जागेत लैगिंक शोषणाचे आरोप झाले. तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे ही बाबही क्रिडा मंत्रालयाने नमूद केली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *