Breaking News

आणखी एका भारतीय तेलवाहू जहाजावर लाल समुद्रात ड्रोन हल्ला

नुकतेच इस्त्रायलशी संबधित जहाज असल्याच्या संशयावरून एका भारतीय मालवाहू जहाजावर अज्ञात हल्लेखोरांनी ड्रोनच्या माध्यामातून हल्ला केला. त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच गॅबन देशाचा झेंडा लावलेल्या भारतीय तेलवाहू टॅकर असलेल्या जहाजावर आज पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी रेड सी अर्थात लाल समुद्रात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आल्याची माहिती अमेरिकन नौदळाच्या एक्स या ट्विटर हॅन्डलवर दिली.

सुदैवाने या ड्रोन हल्ल्यात तेलवाहू टॅकर जहाजावरील कोणत्याही क्रु मेंबरला दुखापत झाली नाही की तेलवाहू जहाजाला नुकसान पोहचले. त्यामुळे हे जहाज मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा ड्रोन हल्ला येमेन देशाशी संबधित हौती या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांकडून करण्यात आल्याचा दावा अमेरिकेन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. १७ ऑक्टोंबरपासून लाल समुद्री मार्गे व्यावसायाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची ही १४-१५ वी वेळ असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

ड्रोनद्वारे गहल्ला करण्यात आलेल्या जहाज हे मुलतः भारतीय जहाज असून त्याचे नाव साईबाबा आहे. या जहाजाच्या माध्यमातून कच्चा तेलाची आयात-निर्यात करण्यात येत. त्याचबरोबर नॉर्वेजियन देशाच्या मालकीचे केमिकल आणि कच्च्या तेलाच्या आयातीसाठी बालेमान या जहाजावरही ड्रोणच्या माध्यमातून हल्ला करण्यात आले. परंतु या हल्यात सदर जहाज थोडक्यात बजावल्याचे सांगितले.

अमेरिकन नौदलाच्या सेंट्रल कंमाडला त्यांच्या वॉकी टॉकीवरील संभाषणात काही अस्पष्ट आवाज आल्याने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न या दोन्ही जहाजावर करण्यात आल्याने लाल समुद्रात लगेच धाव घेतली. त्यामुळे या दोन्ही जहाजांवर कोणत्याही स्वरूपाचे नुकसान दहशतवादी संघटनांना करत आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्याचे वृत्त कळताच अमेरिकन नौदल दलाने लगेच हालचाल केल्याने भारतीय जहाजाचा यशस्वी सुटका करता आली. त्यानंतर भारतातील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, साईबाबा जहाज जरी भारतीय खाजगी कंपनीच्या मालकीचे असले तर ते दक्षिण आफ्रीका खंडातील गबोन या देशासाठी मालवाहतूकीचे कमा करते. तसेच हे जहाज चालविण्याची कामगिरी हे फ्रान्सकडे आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेतील गबोन या देशाना लागणाऱ्या वस्तू पुरविण्याचे काम करते.

Check Also

नवा ITR कर परतावा भरण्यासाठी प्राप्तिकर विभागाने केले हे बदल आता या तीन गोष्टींची माहिती पुरविणे झाले बंधनकारक

प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ (AY २०२४-२५) साठी ITR-3 साठी ऑफलाइन, ऑनलाइन आणि Excel उपयुक्तता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *