Breaking News

सुषमा अंधारेंचा खोचक टोला, त्यांनी बोंब मारली असेल तर आपण समजून घेऊ ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या सुखाची आणि मांगल्याची कामना

उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी शिंदे गटासह भाजपावर उध्दव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी १९ मार्चला उध्दव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचा इशारा दिला. यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, शिमग्याच्या दिवशी त्यांनी बोंब मारली असेल तर आपण समजून घेऊ. पण त्यांना यापेक्षा अधिक महत्त्व देणं गरजेचं नाही, असा टोला रामदास कदम यांना लगावला.

सुषमा अंधारे या आज अहमदनगर येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, खेडच्या सभेत संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिमगा आहे. त्यामुळे शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक आहे. काल शिमगा होता, त्यामुळे रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील यांनी शिमग्याला बोंब मारली असेल तर ती आपण समजून घेऊ. याच्या पलीकडे त्यांना अधिक महत्त्व द्यावं, असं आम्हाला वाटत नाही.

रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, योगेश कदमांनी अत्यंत दर्पयुक्त आणि अहंकाराने भरलेली वाक्य वापरली. पण आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने बडबड करत आहेत. त्याही पेक्षा लोकांच्या दरबारात जाऊन लोकांचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घेणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते काय बोंब मारतात. त्यावर उत्तरं देण्यापेक्षा आम्हाला शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलणं जास्त गरजेचं वाटतं. बाकी योगेश कदमांचं काय होणार? रामदास कदमांच्या भांडी घासण्याच्या विधानाचं काय होणार? हे निवडणुका ठरवतील. ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या सुखाची आणि मांगल्याची कामना करणारे लोक आहोत असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

निश्चितपणे आमचा दर्जा घसरलेला नाही. आमचं मानसिक संतुलनही अजिबातच बिघडलेलं नाही. एवढ्या घडामोडी घडत असताना आम्ही आमचं मानसिक संतुलन टिकवून आहोत. रामदास कदमांचं एकाच सभेनं इतकं मानसिक संतुलन ढासळेल, ते मानसिकदृष्ट्या इतके कमजोर असतील, असं अजिबात वाटलं नव्हतं, अशा खोचक शब्दात त्यांनी टीका केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *