Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये नाही तर अवस्था… सत्तेचा फेस गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल

देशात ६०-६५ वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. मात्र आजची त्यांची अवस्था पाहिली की आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये असा खोचक टोला भाजपासह बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत जे हमाम मे… म्हणून सगळे तिकडे गेलेत. त्या सर्वांच्या शरीरावर सत्तेचा जो फेस आहे तो निघून गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल असा इशाराही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला.

मध्यरात्री उशीरा संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे बोलत होते. त्यावेळी आमदार रविंद्र वायकर, अनिल देसाई यांच्यासह अनेक आमदार, खासदार उपस्थित होते.

हिटलर हा जर्मनीत सत्तेवर होता. त्यावेळी दुसऱ्या महायुध्दाच्या काळात हिटलर रोज एक बाँब टाकायला. त्यावेळी डेविड लो हे रोज एक व्यंगचित्र काढायचा त्यामुळे हिटलर चिडायचा आणि म्हणायचा याला जिवांत अथवा मृत माझ्याकडे घेवून या. त्या डेव्हिड लो यास बाळासाहेब आपला गुरू मानत असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला घरघर लागलीय असे वक्तव्य कालच करत नड्डांनी त्याची पुष्टी केली आहे. वेळीच ह्यांचा डाव ओळखावा लागेल. ते पूर्ण होऊ द्यायचे का? भाजपाकडे लोक नाहीएत का? देशाला एकछत्री राजवटीकडे नेण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. तेच म्हणतात इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येताहेत मग भाजपचा नेमका वंश कोणता असा सवाल करत की त्यांना गुलामगिरी कडे नेण्याचा त्यांचा हेतू आहे. जेणेकरून गुलाम कसे कामापुरते वापरायचे आणि नंतर सोडून द्यायचे असे सध्या यांचे दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

संजय राऊतांचा अभिमान असल्याचे सांगत राजकारणात सध्या बुध्दी दिसत नाही तर फक्त बळच दिसत आहे अशी टीका भाजपावर करत संजय पत्रकार, शिवसैनिक, निर्भिड मला अभिमान असून त्यांच वाक्य मरण आल तरी शरण नाही असे तो म्हणालाय. हे वाक्य जरी पुष्पा चित्रपटातील असला तरी त्यानुसार प्रत्यक्षात वागणे अवघड असते असेही ते म्हणाले.

सध्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुणावनी पुढे ढकलली त्यावर बोलताना म्हणाले की, न्यायालयावर आम्हाला विश्वास. चौथा स्तंभातील एक अटकेत आहेत. गडकरी म्हणाले होते राजकारण सोडायचे पण राजकारण हल्ली घृणास्पद झाले असून राजकारणात दिलदारपणा हवा. तो दिसत नाही. चर्चा व्हायला पाहिजे. प्रत्येक विरोधकाला त्याच्या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी मोकळीक असायला हवी. मात्र सध्या प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वच संपून टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु असल्याचे दिसत आहे.

अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होता. मात्र त्या अडीच वर्षात माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा कधीच गेली नाही. बाळासाहेबांची शिकवण होती. सत्ता येते जाते. त्यामुळे कोणाशी निर्घुणपणे वागू नका आज सत्तेत असलेल्यांना सूचना. आज जी वेळ आमच्यावर ती उद्या तुमच्यावरही येवू शकते असा इशाराही त्यांनी दिला.

एकनाथ शिंदेबाबत विचारले असता ते म्हणाले शिंदेंना केदार दिघेंनी चांगले उत्तर दिलय. त्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल असा त्यांचा उल्लेख करणार नाही. पण कोश्यारींनी काल जे काही वक्तव्य केले. ते हिंदूमध्ये फूट पाडण्याचे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे प्रादेशिक पक्षांची एकजूट परवाच्या त्यांच्या वक्तव्यातून झाली काल नड्डांनी शिक्कामोर्तब केलय. काँग्रेसने जाहिर केलेल्या आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिल्याबाबत बोलले असता ते म्हणाले, आणीबाणीला अनुशासनासाठी पाठिंबा दिला. ज्यांच्या राजकारणासाठी संबंध नव्हता त्यांनी पण तेव्हा लोकशाहीच्या अग्नीकुंडात सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

काल-परवा एक दलाल बोलला मला आमदार खासदार शोधावे लागतात पण माझ्या सोबत दमदार आहेत असा टोला लगावत नड्डांच्या वक्तव्यात तुम्हाला लोकशाही दिसते आहे का मला सांगा? दिवस बदलत असतात अच्छे दिन कधी येतील तो मुद्दा वेगळा. तुमच्याकडे विचार असतील तर जनतेसमोर येऊन निकाल होऊ द्या. ईडी, आयटी, सीबीआय हे लोकशाही नाही असेही ते म्हणाले.

नड्डांचे कालचे भाषण घातक असून सरकारलाच न्यायालयात आव्हान दिलय. ममता दिदी केसीआर संपर्कात आहेत. नड्डांच्या पोटातलं काल ओठावर आल असल्याचे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *