Breaking News

शिवसेनेला दोन जागांचा फायदा तर भाजपने गड राखला राष्ट्रवादीने लाज राखली तर काँग्रेसला धक्का

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेला नाशिक आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-ग़डचिरोली या मतदारसंघातील जागा कायम राखण्यात भाजपला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे  सध्या एक जागा राखण्यात यश आले आहे. मात्र काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून त्यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही.

या सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बीड-उस्मानाबाद आणि लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल नंतर जाहीर होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली या मतदारसंकडून घातून भाजपचे मितेश भांगडीया, परभणी-हिंगोली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी, काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातून), राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक मतदारसंघातून ), भाजपचे उद्योग राज्यमंत्री  प्रवीण पोटे (अमरावती मतदारसंघातून) आदी सदस्य निवृत्त होत आहेत. यातील भाजपच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसची एक जागा रिक्त झाली.

यातील अमरावती मतदारसंघातील जागा भाजपचे उमेदवार तथा राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी कायम राखली आहे. तसेच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर यांनीही आपली जागा कायम राखली. तर राष्ट्रवादीकडे असलेली नाशिक आणि परभणी या दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला काहीही नसताना दोन जागांचा बोनस मिळाला आहे. याशिवाय अपेक्षेप्रमाणे कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसची अनिकेत तटकरे यांनी जागा राखली आहे. तर लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघाचा निकाल पुढे ढकल्यात आल्याने भाजपचे सुरेश धस कि काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे हे विजय खेचून आणणार याबाबतचा निकाल नंतर लागणार आहे.

विधानपरिषद निवडणूकीतील विजयी उमेदवार

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था

शिवसेना – नरेंद्र दराडे (४१२ मतं)

राष्ट्रवादी – शिवाजी सहाणे (२१९ मतं)

शिवसेना- १९३ मतांनी विजयी

 

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था

राष्ट्रवादी – अनिकेत तटकरे (४२१ मतं)

शिवसेना – राजीव साबळे (२२१ मतं)

राष्ट्रवादी २०० मतांनी विजयी

 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

शिवसेना – विप्लव बाजोरिया (२५६ मतं)

काँग्रेस – सुरेश देशमुख (२२१ मतं)

शिवसेना ३५ मतांनी विजयी

 

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था

भाजपा – प्रविण पोटे-पाटील (४५८ मतं)

काँग्रेस – अनिल मधोगरिया (१७ मतं)

भाजप ४४१ मतांनी विजयी

 

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था

भाजपा – रामदास आंबटकर (५५० मतं)

काँग्रेस – इंद्रकुमार सराफ (४६२ मतं)

भाजप ८८ मतांनी विजयी

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *