Breaking News

राम कदम यांची भाजपमधून गच्छंती ? अभाविप संघटनेकडूनही कदमांविरोधात जुते मारो आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी

महिलांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात समाजाच्या सर्वचस्तरातून आणि प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठली. त्याचे राजकिय पडसादही मोठ्या प्रमाणावर उमटण्यास सुरुवात झाल्याने अखेर भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आता कदम यांच्या विरोधात जुते आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पक्षातून गच्छंती अटळ असल्याचे बोलले जात आहे.

राम कदम यांच्या विरोधात अभाविपकडून त्यांच्या घाटकोपर मतदारसंघात जुते मारो आंदोलन आज संध्याकाळी करण्यात येत आहे. ही विद्यार्थी संघटना भाजप पक्षाशी संलग्न आहे. त्यामुळे पक्षाच्याच संघटनेकडून राम कदम यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या गंच्छतीवर शिक्कामोर्तब असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

कदम यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असून या होत असलेल्या टीकेला रोखायचे कसे असा प्रश्न पक्षातील धुरीणांना पडला आहे. त्यातच भाजपचा सत्तेतील सहयोगी मित्र असलेल्या शिवसेनेनेही राम कदम यांच्या वक्तव्यावर टीका करत भाजपवरही गरळ ओकली आहे. कदम यांच्या निमित्ताने राजकारणात पक्षाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने पक्षाच्याऐवजी पहिल्यांदा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राम कदम यांच्या विरोधात जुते मारो आंदोलन करायचे आणि त्यानंतर भाजपच्या महिला संघटनेकडूनही आंदोलन करण्याची रणनीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आखल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *