Breaking News

वकीलांच्या उपस्थितीत नवाब मलिकांच्या चौकशीस न्यायालयाची परवानगी पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या तीन मागण्यांना दिली मंजूरी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना घरचे जेवण मिळावे, तसेच वकीलांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात यावी, घरचे जेवण घेण्यास परवानगी आणि औषधोपचार घेण्यास परवानगी मिळावी याबाबत विनंती अर्ज आज मलिकांचे वकील अमित देसाई यांनी पीएमएलए न्यायालयात एका अर्जान्वये केली. त्यास न्यायालयाने आज मंजूरी दिली.

त्यानुसार आता नवाब मलिक यांना घरचे जेवण ग्रहण करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर ईडीच्या चौकशीवेळी मलिकांचा वकील उपस्थित राहण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच त्यांना काही व्याधी असल्याने त्यावरील औषधांच्या सेवनास परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टींच्या सवलती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही मिळालेल्या आहेत.

१९९९ साली सलिम पटेल याच्या मध्यस्थीने कुर्ला येथील जमिन खरेदी करताना रोख रक्कमेचा वापर करण्यात आला. यातील सलिम पटेल हा अॅडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण असलेल्या हसीना पारकर हिच्या गाडीवर ड्रायव्हर होता. त्याच्या मार्फत ही संपत्ती खरेदी करण्यात आल्याचा आरोप मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असून मलिक यांनी मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप ईडीने करत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर तब्बल ८ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने त्यांना अटक केली.

त्यानंतर त्यांना पीएसएलए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावे‌ळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुणावली. ही कोठडी ३ मार्च पर्यत राहणार आहे. कदाचित ३ मार्चला ईडीकडून पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यावेळी त्याबाबतचा पुढील निर्णय होईल.

दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान यांनी ईडीकडून मिळालेल्या आरोप पत्रात नवाब मलिक हे महसूल मंत्री असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच महसूल मंत्री म्हणून असताना त्यांनी ३०० कोटी रूपयांच्या जमिन कवडी मोल भावाने खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे सांगत मलिक हे कधीही महसूल मंत्री नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर लावण्यात आलेला हा आरोप चुकीचा असल्याचा आणि निराधार असल्याचे म्हटले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *