Breaking News

कोरोना म्हणजे देशातील “कोणीही (२१ दिवस) रस्त्यावर दिसणार नाही” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली: प्रतिनिधी

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आतापर्यत प्रयत्न करण्यात येत होते. मात्र आता त्याचा वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश बंद अर्थात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कालावधीत कोणताही नागरीक घरातून बाहेर पडू शकणार नाही. तसेच हे कायदेशीर बंधन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

या लॉकडाऊनमुळे सर्वात मोठे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र त्याला पर्याय नसून या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणताही पर्याय नाही. तसेच याची साखळी तोडने गरजेचे असून त्याचाच एक भाग म्हणून सोशल डिस्टनंसिंग ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाची सायकल तोडणे महत्वाचे असून ही सायकल जर तोडली गेली नाही तर त्याचा परिणाम येथील प्रत्येक नागरीक, कुटुंबियावर होणार आहे.  हे आताच आपण केले नाही तर २१ वर्षे मागे जावू अशी भीती व्यक्त करत आपले घरातून बाहेर पडणारे एक पाऊल कोरोनाच्या आजाराला आमंत्रण देणारे ठरू शकते अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

देशात.कोरोना व्हायरसला  ६७ लोकांपासून दोन लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ११ दिवस लागले. तर २ लाखाहून आणखी १ लाख जनतेपर्यत पोहोचण्यास फक्त ४ दिवस लागल्याचे सांगत हा प्रादुर्भाव रोखणे आता गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्राला सशक्त करण्यासाठी १५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रत्येक रूग्णालय कोरोनाची चाचणी करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्याच्यादृष्टीने मजबूत करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच सर्व राज्यांतील सरकारही याच गोष्टीला प्राथमिकता देतील असे त्यांनी सांगितले.

जगात अमेरिका, इटलीतील आरोग्य सेवा सर्वोष्कृष्ठ आहेत. मात्र त्या सेवाही कोरोनाचा सामना करण्यास अपुऱ्या पडल्याची बाब त्यांनी नमूद केली. तसेच कोरोना म्हणजे कोई रोड पर ना निकले असा नवा अर्थही कोरोना व्हायरसचा त्यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *