Breaking News

अजित पवार म्हणाले, मी असं सटकवलं सरकारला म्हटले काय चाललंय हे कुणीही किती मोठ्या बापाचा असेल कारवाई झालीच पाहिजे

आपल्या राज्यात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अगदी अजित पवारानेही नाही तसाच तो शेवटच्या माणसानेही करू नये. कायदा बिघडवण्याचा कुणी प्रयत्न कुणी केला तर कुणीही किती मोठ्या बापाचा असेल, विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका अजित पवार यांनी घेतली.

पुण्यातल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मध्यंतरी कोयता गँग कोयता गँग म्हणत होते. सभागृहात असं सटकवलं मी सरकारला म्हटलं हे काय चाललं आहे काही धाक आहे की नाही? असं म्हणत अजित पवार यांनी सरकारला जाब विचारला. एवढंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला.

पोलिसांचं काम नाही का कायदा आणि सुव्यवस्था राखणं? जे काही व्हायचं असेल ते कायद्याच्या कक्षेतच झालं पाहिजे. राज्यात सगळ्यांना समान अधिकार आहेत. मलाही तोच नियम लागू आहे जो सामान्य माणसाला लागू आहे असंही अजित पवार म्हणाले.

महिलांचे दागिने लुटणं, चोरी, कार किंवा बाईक यांची तोडफोड, जेवणाचं बिल न भरता हॉटेलमध्ये राडा घालणं यांसारख्या हिंसक घटनांमुळे पुणेकर धास्तीत आहेत. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे तरूण रात्री अपरात्री रस्त्यावर हवते कोयते परजत फिरतात आणि चोऱ्या करतात त्यांच्यावर सरकार जरब बसवणार की नाही? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता. आज या सगळ्याचीच आठवण त्यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली. तसंच जो कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करताना दिसेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे मग तो कुणीही असो अशी तंबीही अजित पवार यांनी पोलिस आणि गृहगखात्याला दिली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *