Breaking News

राष्ट्रवादीच्या मोहीते-पाटील साम्राज्याला मोठा धक्का सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

मुंबई : प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे सोलापूर जिल्हा बँकेवर सत्ता असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे संचालक मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील गटाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सोलापूर जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या काही वर्षात रिझर्व्ह बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेपेक्षा जास्त प्रमाणात कर्जाचे वाटप केले. त्याचबरोबर कर्जाची वसुलीही कमी प्रमाणात केल्याचा ठपका नाबार्डने सोलापूर डिसीसी बँकेच्या संचालक मंडळावर ठेवला. याबाबत रिझर्व्ह बँकेनेही तीव्र नापसंती व्यक्त करत अखेर बँकेचे संचालक मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा बँकेने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या साखर कारखाने, सुत गिरण्या यासह विविध संस्थांना मोठ्या प्रमाणावर कर्जाचे वाटप केले. मात्र त्याची परतफेड करण्यात चालढकल केली. त्याचा ताण बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर झाला. त्यामुळे अखेर राज्य सरकारने सहकार कायद्यातील ११० अ अंतर्गत कारवाई करत बँकेचे संचालक मंडळच बरखास्त केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *