Breaking News

अखेर राष्ट्रवादीकडून सातारा आणि रावेरच्या उमेदवारांची नावे जाहिर

देशातील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील दोन महिन्यापासून सुरु झालेल्या चर्चेवर काल शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून फक्त पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचीच नावे जाहिर केली होती. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा लोकसभा जागेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यानंतर काँग्रेसच्या कोट्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचा आणि त्याच्या बदल्यात सातारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यायचा असा प्रस्तावही काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रस्तावाला स्पष्ट शब्दात नकार दिला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार अखेर सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून जाहिर करण्यात आली.

तसेच भाजपामधील अंतर्गत कलहाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी भाजपाकडून पुन्हा बोलावणे आल्याचे सांगत रावेरमधून निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून अशोक पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *