Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी, बीडचे उमेदवार केले जाहिर

लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली असून काँग्रेसने हक्क सांगितलेल्या भिवंडीतून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर बीडमधून विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी ऐनवेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अखेर पक्षाचे कार्यकर्त्ये बजरंग सोनावणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली.

वास्तविक पाहता बीडमधून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना दिल्लीत जाऊन राजकारण कऱण्याची अजिबात इच्छा नसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. त्यातच शिवसंग्राम संघटनेचे नेते स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यानंतर काही दिवसातच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यामुळे ज्योती मेटे यांना नेमक्या कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात येणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली होती.

या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा एकदा बीडमधील लोकसभा उमेदवाराच्या अनुषंगाने चर्चा आणि चाचपणी केली असता ज्योती मेटे यांनी विद्यमान स्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्यास आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा बीडमधून पक्षाचे कार्यकर्त्ये बजरंग सोनावणे यांच्या अर्जाबाबत निर्णय घेत बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहिर केली.

दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कपिल पाटील हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूकीला उभे आहेत. कपिल पाटील यांना त्यांच्याच बाले किल्ल्यात लढत देण्यासाठी त्याच्या इतकाच तुल्यबळ उमेदवार म्हणून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांचा विचार सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरु होता. मात्र भिवंडी हा मतदारसंघ परांपरागत काँग्रेसचा असल्याने काँग्रेसचा मतदार आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघावरील हक्क काँग्रेस सोडायला तयार नसल्याने सातारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला तर बदल्यात भिवंडी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याच्या अटीवर भिवंडीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *