Breaking News

मी राष्ट्रवादीचा सहयोगी सदस्य म्हणून आमदाराकीची शपथ घेणार लातूर विधान परिषदेचे उमेदवार अशोक जगदाळे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीतील लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी मैदानातून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देत त्यांनाच या जागेवरून निवडूण आणण्याची घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर आमदारकीची शपथ राष्ट्रवादी काँग्रेसचा सहयोगी पक्ष म्हणून शपथ घेणार असल्याचे जगदाळे यांनी जाहीर केले.

मुंडे गटाचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणत त्यांना विधान परिषदेची उमेदवारीही दिली. रमेश कराड यांना पक्षात आणण्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. परंतु ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमेश कराड यांच्यावर दबाव आणि महामंडळाचे गाजर दाखवित त्यांना या निवडणूकीतून ऐनवेळी माघार घ्यायला लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठी नामुष्कीची वेळ आली.

मात्र राष्ट्रवादीचेच आणखी एक कार्यकर्ते अशोक जगदाळे यांनीही या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने जगदाळे यांनाच पाठिंबा जाहीर करत त्यांच्या विजयाची रणनीती आखली आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *