Breaking News

एकनाथ खडसे म्हणाले, काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता पण ते… ... तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार - एकनाथ खडसे

एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

एकनाथ खडसेंच्या मागे सर्व यंत्रणा लावल्या आहेत. मिळेल ती चौकशी करत आहे, प्रचंड छळवणूक केली जात आहे. तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार असे ठणकावून सांगतानाच हे सगळे बदनाम करण्याचे कारस्थान आहे. आम्ही याला भीक घालत नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

या भागात आमदार निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवे, संघटनेचा पाया मजबूत करायला हवा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता हस्तगत करायला हवी तेव्हा आपल्याला लोकहिताचे काम करून आपले आमदार निवडून आणू शकतो असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जळगांव जिल्हा राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी एकनाथ खडसे बोलत होते.

या जिल्ह्यात राष्ट्रवादी एकटी आहे. आपल्या विरोधात सर्व विरोधक आहेत पण आपण पुरून उरणार असल्याचे स्पष्ट करतानाच शरद पवार आजतागायत लढत आहेत. अहंमपणा विसरून जर आपण काम केले तर निश्चित लोकं तुमच्या मागे उभा राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जयंत पाटील हे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. पदाधिकारी जर असा कर्तव्यदक्ष राहिला तर नक्कीच आपली संघटना एका विशेष टप्प्यावर येईल अशा शब्दात जयंत पाटील यांचे विशेष कौतुक त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा व पक्षाच्या अडचणी सांगितल्या.

यावेळी आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, रोहिणीताई खडसे, संतोष चौधरी, मनिष जैन, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, दिलीप सोनवणे, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक वंजारी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *