Breaking News

सोलापूरचे सुपुत्र न्यायमुर्ती उदय लळीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

भारताचे ४९ वे  सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ  घेतली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी (२६ ऑगस्ट २०२२) संपला. न्या.लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व ८ नोव्हेंबर २०२२ रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या.लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील न्या.उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. न्या.उदय लळीत यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या नूमवि आणि हरिभाई देवकर हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. न्या.लळीत हे २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. आणि आज त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सरन्यायाधीश उदय लळीत यांचे अभिनंदन

 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमुर्ती उदय लळीत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यायमुर्ती लळीत यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.  “महाराष्ट्र सुपुत्र न्या.लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत करणारी ठरेल,” असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *