Breaking News

राज्य सरकारमुळे नाणारचा तमाशा झालाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील नाणार येथील रिफायनरीच्या प्रकल्पावरून सध्या सुरु असलेला गोंधळ हा आतून किर्तन बाहेरून तमाशा झाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राज्याचे उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाईं हे जाहीर सभेत सांगतात कि अधिसूचना रद्द करण्यात आली. आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योग मंत्र्यांच वैयक्तीक मत असेल अस सांगतात. उद्योग मंत्र्याच मत हे व्यक्तीगत कसे असू शकेल? असा सवाल विचारत मंत्र्याच मत हेच सरकारच मत असत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरडे रंग बदलतात पण सरड्यांनाही लाज वाटेल असं हे सरकार रंग बदलत असल्याचा आरोप करत High power Committee ही मंत्र्यांना  subordinate आहे. त्यामुळे सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या under उच्चधिकार समिती असते.  मंत्र्यांपेक्षा उच्चधिकार समिती मोठी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना जर खरच स्वाभिमानी पक्ष असता तर एवढा मोठा अपमान झाल्यावर त्यांनी राजीनामा देवून सत्तेतून बाहेरचा रस्ता धरला असता. स्वाभिमान असेल तर एवढा अपमान झाल्यावर सुभाष देसाईंनी मल्लीनाथीही त्यांनी यावेळी केली.

२८ तारखेला नाणार रिफायनरी संदर्भात कॉंग्रेसचं डेलिगेशन राहुल गांधीना भेटणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *