Breaking News

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, त्या घटकांना जाणीव व्हायला लागली..

विदर्भ संशोधन मंडळाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राम्हण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो. हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था घट्ट झाली आणि आपल्याकडून मान खाली घालावी घालवायला लावणारे क्रत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही असे वक्तव्य करत जात व्यवस्थेत ब्राम्हण समुदायाने केलेल्या अत्याचाराची एकप्रकारे कबुलीच दिली. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, त्या घटकांना जाणीव व्हायला लागली हा बदल योग्य असल्याचे मत व्यक्त करत भागवतांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष स्वागत केले.

नागपूरातील एका कार्यक्रमासाठी ते विमानाने नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी वरील वक्तव्य केले.

शरद पवार म्हणाले, इतिहासात समाजात सामाजिक विषमतेला धरून जे काही घडले आहे, त्याबाबत आज आपण माफी मागितली पाहिजे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान माझ्याही वाचनात आले. समाजातील एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या ज्या यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाणीव व्हायला लागली. हा बदल योग्य आहे. नुसती माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाच्याबाबत भूमिका कशी घेतो यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

यवतमाळहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा आज पहाटे अपघात झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. आपण सर्वच त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. राज्य सरकार या अपघाताची चौकशी करत आहे. चौकशीनंतर त्यामागील कारणं कळतील असेही ते म्हणाले.

आता या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर उपचार कसे मिळतील याची व्यवस्था राज्य सरकार व स्थानिक प्रशासन बघत आहे असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर नागपूरातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचे मोठे योगदान आहे. या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तसेच अल्पसंख्याकांनी सर्वच क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे.

आजघडीला कला, लेखन किंवा कविता असो या सर्वच क्षेत्रात योगदान देण्याची मोठी क्षमता अल्पसंख्याकांमध्ये आहे. बॉलिवडूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक योगदान कोणी दिलेले आहे? बॉलिवूडच्या प्रगतीसाठी मुस्लिमांनी सर्वाधिक योगदान दिलेले आहे. याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *