Breaking News

राज ठाकरे म्हणाले, विषय फक्त मस्जिदींचा नाहीतर मंदिरांचाही आहे भोंग्यावरून पुन्हा राज ठाकरेंनी मांडली भूमिका

भोंग्यामुळे लोकांना जो दिवसभराचा त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदीवरील भोंग्यांचाच हा भाग नाही. मंदिरांवरचे ही आहेत अशी स्पष्टोक्ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करत मशिदींवरील भोंग्यांसाठी पोलिसांकडे इतके अर्ज आले इतक्याला परवानगी दिली, अशी माहिती दिली. आता मुंबईत, महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत त्या बहुतांशी अनधिकृत आहेत. सरकार त्याला परवानगी देते अधिकृत. ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. ही परवानगी कशासाठी कोणासाठी देताय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरता नाहीय दिवसभर चार ते पाच वेळा बांग दिली जाते ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोक त्या त्या वेळी हनुमान चालिसा वाजवणार असा इशारा देत तुम्ही, ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता. दिवसाची परवानगी देणार आणि यांना ३६५ दिवसांची देणार कशासाठी? यांनी पण रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे, सुप्रीम कोर्टाच्या नियमांमध्ये बसून असेही त्यांनी सांगितले.
रोज सकाळी डेसिबल मोजत बसायचा धंदा आहे का पोलिसांना? असा संतप्त सवाल राज यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. पुढे बोलताना म्हणाले की, तुम्हाला माइक आणि स्पीकर कशाला लागतो कोणाला ऐकवायचं आहे तुम्हाला? हे भोंगे उतरवले गेले पाहिजे जोपर्यंत उतरवले जाणार नाही तोपर्यंत हे असं सुरु राहणार असल्याचा इशारा देत जे सरकार सांगतंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय तर पूर्ण करा असं आमचं म्हणणं आहे. आज ९२ टक्के ठिकाणी झाली नाही तर आम्ही खूष असू असं वाटत असेल तर आम्ही अजिबात खूष होणार नाही. भोंगे डेसिबलमध्येच लागले पाहिजेत असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला.
ज्या ज्या मशिदींवर भोंगे वाजतील त्या त्या मशिदींच्या बाहेर हनुमान चालिसा वाजत राहणार असा इशारा पुन्हा देत हा सामाजिक विषय आहे याचा उल्लेख राज यांनी पुन्हा एकदा करत, धार्मिक वळण द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय? ती पण मोबाईलच्या काळात, संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार? हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताय का? एवढा मुर्खपणा, हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही असा टोला राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना लगावला.
महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय ही हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलिस कमिशनर, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल. ३६५ दिवस दिवसभरात चार चार पाच पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय. यांचा धर्म मोठा माणुसकीपेक्षा… पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा. हा एका दिवसाचा विषय नाही ४ तारीख पकडू नका जो पर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
पुढे बोलताना राज यांनी, मला तो मुंबईचा रिपोर्ट आलाय त्याप्रमाणे मुंबईमध्ये ११४० मशिदी आहे १३५ मशिदींमध्ये अजान पाच वाजायच्या आत लावली गेली. मला काल नांगरे-पाटलांचा फोन आलेला. सकाळची अजान लावणार नाही असं ते म्हणाले होते. मग या ज्या १३५ मशिदींमध्ये भोंगे वाजले त्यावर कारवाई करणार की नाही? असा सवला करत या मशिदींवर कोणती कारवाई करणार की आमच्याच मुलांना उचलणार? असा खोचक सवालही त्यांनी पोलिस प्रशासनाला केला. त्याचप्रमाणे, हा श्रेयाचा विषय नाहीय हा विषय सामंजस्याने हाताळले तर हा सगळ्यांचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *