Breaking News

राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्यात अखेर जामीन मंजूर चौकशीला २४ तास आधी नोटीस द्यावी

हनुमान चालिसा म्हणण्यावरून अमरावतीच्या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासमोर जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच पोलिसांनी नोटीस बजाविल्यानंतरही राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराकडे जाण्याचा हट्ट धरल्याने राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज अखेर राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर मुंबई विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.
राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक करत त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळे पध्दतीचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील एकामध्ये आरोप पत्रात त्यांच्यावर राजद्रोहाच्या खटल्यासह सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे आणि दोन गटांमध्ये प्रक्षोभक वातावरण करणे असे एक आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. तर दुसऱ्या एका आरोप पत्रात त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे सारख्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र राणा दाम्पत्याने हे दोन वेगवेगळे दाखल करण्यात आलेले आरोप पत्र एकत्रित करावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मागणी केली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली.
त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई विशेष दिवाणी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यात आल्यानंतर काल सोमवारी यासंदर्भातील अंतिम निर्णय जाहिर करण्यात येणार होता. मात्र दिवसभरात तीन वेळा या निर्णयबाबतची वेळ निश्चित करण्यात आली. मात्र निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे अखेर न्यायालयानेच याप्रश्नी लगेच बुधवारी सकाळी निर्णय जाहिर करणार असल्याचे सांगत अखएर राणा राम्पत्याला जामीन मंजूर केला.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा याची ५० हजाराच्या प्रत्येकी जात मुचलक्यावर या दोघांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय विशेष न्यायालयाचे न्यायधीश आर. एन. रोकडे यांनी दिला.
तसेच राणा दाम्पत्याला चौकशीसाठी बोलवायचे असेल तर त्यांना २४ तास आधी नोटीस पाठवावी अशी सूचनाही न्यायालयाने पोलिसांना केली.
दरम्यान न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना म्हणाले की, अटक पूर्णत बेकायदेशीर असून त्यांना अटक करण्यापूर्वी त्यांना नोटीस द्यायला हवी होती. पण ती गोष्टी झाली नाही. त्याचबरोबर १५३ ए अन्वयेखालील त्यांचे कृत्य त्या धर्तीचे असल्याचे सिध्द होत नाही की त्यांचा उद्देश चुकीचा होता असे म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हंटल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला असता यात तत्थ वाटत नाही त्यामुळे १५३ ए कलम त्यांना लागू होवू शकत नसल्याचे मतही न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात नोंदविले आहे.
तसेच पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजाविल्यानंतर ते घराबाहेर पडले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत केवळ बोलण्याच्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी १५३ ए हे कलम लागू करण्यात आल्याची बाबही न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात नोंदविली आहे.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *