Breaking News

टिळकांचे खापर पणतू म्हणतात, समाधीचा दावा नाही पण स्मारकासाठी पैसे गोळा केले राज ठाकरेंच्या वक्तव्यावर केला खुलासा

नुकत्याच झालेल्या औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा खळबळजनक दावा करत आता त्यांच्याकडेही जातीय दृष्टीकोनातून पाहणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. मात्र राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक म्हणाले की, टिळकांच्या घरातील कोणीही शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचा दावा केला नाही. मात्र समाधी उभारण्यासाठी पैसे गोळा केले होते असा खुलासा केला.

आता कुणाल टिळकांनीच यासंदर्भातील खुलासा केल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आला आहे. राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर समाजमामध्यमावर मोठ्या प्रमाणावर टिळकांची आणि राज यांच्या दाव्याची मोठ्या प्रमाणावर टिंगल उडविण्यास सुरुवात झाली. तसेच त्यावरून टीका टीपण्णीही सुरु झाली. यापार्श्वभूमीवर एका दूरचित्रवाणीने कुणाल टिळक यांचीच प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी कुणाल टिळकांनी माहिती दिली.

लोकमान्य टिळक असताना शिवाजी महाराजांच्या समाधी उभारणीबाबत तळेगावचे दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एक बैठक झाली होती. त्याचे अध्यक्षही दाभाडेच होते. समाधी उभारण्यासाठी राज्यातील जनतेकडून पैसे गोळा करण्याचे ठरले. त्यानुसार त्यावेळी काही हजार रूपयेही गोळा करण्यात आले आणि ते त्यावेळच्या डेक्कन बँकेत ठेवण्यात आले. त्या पैशातूनच सरकारी प्रॉमिसरी नोट वगैरे खरेदी करण्यात आली होती. मात्र कालांतराने ती बँक दिवाळखोरीत निघाली आणि ते पैसे बुडाल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या पैशासंदर्भातील सगळा हिशोब त्यावेळच्या केसरी वर्तमान पत्रात छापून आलेली आहे. तसेच त्याच्या प्रती आजही गायकवाड वाड्यात उपलब्ध असल्याचे सांगत कोणाला हव्या असल्यास ती माहिती आम्ही काढून दाखवू शकतो असेही ते म्हणाले.

त्यानंतर लोकमान्य टिळकांनी ते बुडालेले पैसे परत मिळावेत यासाठी त्यावेळच्या ब्रिटीश सरकारशी बोलणी केली. परंतु ते पैसे परत मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

परंतु त्यावेळी पहिल्यांदा तीन दिवसांची शिवजयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र ब्रिटीशांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकमान्य टिळक रायगडावरून महाबळेश्वर येथे त्यावेळचे ब्रिटीश अधिकारी सँण्डहर्स्ट यांना भेटले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पहिल्यांदा तीन दिवस शिवजयंती साजरी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भातील सर्व माहिती त्या वेळचे वर्तमान पत्रात उपलब्ध असल्याचेही सांगत मात्र केवळ या कारणास्तव लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेले कार्य कमी ठरविणार का? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *