Breaking News

फडणवीसांच्या दाव्याला राऊतांकडून अडवाणींच्या तोंडून उत्तर एनडीटीव्हीवरील मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करून दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत भाजपाच्यावतीने मुंबईतील सोमय्या मैदानावर जाहीर सभा आयोजित केली. या सभेला संबोधित करताना भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडताना मी स्वत: तेथे उपस्थित होतो. तसेच बदायु येथील तुरूंगातही होतो असा दावा करत त्यावेळी तुम्ही कोठे होतात असा सवाल शिवसेनेला करत बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपाचे नेते होते असं यावेळी फडणवीस म्हणत बाबरी शिवसैनिकांनी पाडली या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती. परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली.

परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत अशी टीका त्यांनी केली.

त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्याला प्रत्युत्तर देताना चक्क भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या एनडीटीव्हीवरील मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. तसेच हा व्हिडिओ २९ डिसेंबर २००० सालचा आहे.

यामध्ये लालकृष्ण आडवाणी सांगत आहेत की, ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मी सर्वात प्रथम उमा भारती यांना पाठवलं होतं. परत आल्यानंतर त्यांनी घुमटावर चढलेले लोक मराठीत बोलत असून ऐकायला तयार नसल्याचं सांगितलं. म्हणून मी प्रमोद महाजन यांना पाठवलं. पण तेदेखील हतबल होऊन परत आले. मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना मला जाऊ द्या असं सांगितलं. पण त्यांनी जाऊ दिलं नाही.

 

तर सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल असा खोचकही टोलाही त्यांनी लागवला.

इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला झालं काय? संपलेला विषय का काढत आहेत? वातावरण बदललं आहे, प्रश्न बदलले आहेत. अशावेळी मूळ प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपा आणि त्यांचे छुपे साथीदार याकडे लोकांना आकर्षित करत आहेत. त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

 

Check Also

पालघरचे खासदार डॉ राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे विद्यमान खासदार डॉ राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *