Breaking News

जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा

सोलापूरः प्रतिनिधी
जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मागील काही वर्षापूर्वी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे बंधू संजयमामा शिंदे यांच्यात राजकिय कुरघोडीचे राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे संजयमामा भाजपाच्या वाटेवर तर कधी शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. तसेच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर बबनदादा शिंदे हे ही शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या दोन्ही भावांनी भाजपा-शिवसेनेला झुलवित राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले.
बबनदादांना माढ्यातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संजयमामांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांना करमाळ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. तसेच स्व.दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांनाही करमाळ्यातून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. करमाळ्याचे नेते जयंतराव जगताप यांच्यावर मारहाण, धमकाविणे आदी गुन्हे दाखल होत त्यांना तुरुंगवारी घडल्याने निवडणूकीपासून दूर राहणेच पसंत केले. बागल गटाला आमदाराकीपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतील एका नेत्याने जगताप आणि शिंदे यांच्या मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
त्यामुळेच करमाळा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांच्याऐवजी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या विजयासाठी काम करण्याचे आदेश पक्षाच्यावतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *