Breaking News

जयंत पाटील यांचा सवाल, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले, मुळात दोन टप्प्यात मतदान होऊ शकते, हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

जयंत पाटील म्हणाले की, मुळात देशभरात सात टप्प्यात व महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान घेण्याची गरज नाही, चार ते पाच टप्प्यात हे मतदान प्रक्रिया पार पडली असती. विशेषत महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ त्यासाठी ५ टप्पे मतदानासाठी काहीच गरज नव्हती. यातून कोणाची सोय करायची आहे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे अशी शंकाही यावेळी उपस्थित होती.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, ऑल इंडिया पँथर सेना ही अनेक राज्यात काम करत असते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे आज महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. आज त्यांनी शरद पवार साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे त्याच मनपूर्वक अभिनंदन करतो असेही सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत आमचा प्लान बी नाही आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे. आमचा प्लान एकच आहे. प्रकाश आंबेडकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील एकच प्लान आमच्या करिता ठेवावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

जयंत पाटील यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, महायुती मधील दोन मित्र पक्ष यांना बाजूला ठेवून भाजपने आधीच जागा वाटप करत यादी जाहीर केली आहे. आम्ही आघाडीचा धर्म पळतो. सर्वांचे वाटप झाल्यावर आम्ही करतो. बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी सोबत येतील. ते सोबत तोडगा काढतील. संविधान वाचवण्यासाठी सोबत येणं गरजेचं आहे अशी आवश्यकताही व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले की, बीड लोकसभा मतदारसंघात काय कारण आवश्यक आहे. आज ज्योती मेटे यांच्यासोबत यावर आम्ही सल्लामसलत केलं आहे. अंतिम निर्णय जाहीर करू. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रपक्ष बोलत आहेत. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत असेही सांगितले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *