Breaking News

“मॅडम सोनिया गांधीजी आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही…”, असे म्हणत ओवैसींचा संताप आरएसएसचे उमेदवार जगदिश शेट्टार यांच्या प्रचाराचावरून व्यक्त केला संताप

भाजपामध्ये योग्य पध्दतीने सन्मान दिला गेला नसल्याच्या कारणावरून कर्नाटकातील एकेकाळचे वजनदार नेते जगदीश शेट्टर यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसचा हात हाती धरला. त्यानंतर काँग्रेसने जगदीश शेट्टर यांना त्यांच्या परंपरागत हुबळी-धारवाड या मतदार संघातून उमेदारी जाहिर केली. त्यानंतर काँग्रेस नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज जगदीश शेट्टार यांच्या प्रचारार्थ हुबळी-धारवाड येथे प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेवरून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी हे सोनिया गांधी यांच्यावर संतापून म्हणाले की, सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उमेदवाराचा प्रचार करतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.

ओवैसी यांनी सोनिया गांधी यांना प्रश्न केला की, हीच तुमची धर्मनिरपेक्षता आहे का? अशा प्रकारे तुम्ही नरेंद्र मोदींशी लढणार आहात का? असा सवलाही ओवैसी यांनी केला. पुढे बोलताना असुद्दीन ओवैसी म्हणाले, मॅडम सोनिया गांधीजी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती की, तुम्ही कधी आरएसएसच्या लोकांचा प्रचार करण्यासाठी इथे याल, असं कधीच वाटलं नव्हतं. जगदीश शेट्टार हे आरएसएसचे आहेत. काँग्रेस वैचारिक लढाईत अपयशी ठरत आहे. ही खूप शरमेची बाब आहे. त्याचवेळी या काँग्रेसचे जोकर, नोकर, गुलाम माझ्यावर आरोप करत असतात.
काँग्रेसने हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदार संघतून जगदीश शेट्टार यांना मैदानात उतरवलं आहे. या मतदार संघातून शेट्टार मागच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर आमदार झाले होते.

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने मात्र शेट्टार यांची पाठाराखण केली आहे. शेट्टार यांच्या काँग्रेस प्रवेशाचा बचाव करताना काँग्रेस नेत्यांनी दावा केला आहे की, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आरएसएसशी संबंधित असूनही ते धर्मनिरपेक्ष एक व्यक्ती आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *