Breaking News

निवडणूका डोळ्यासमोर ठेवत पहिल्या टप्प्यात २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात आणखी २० ते ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांना अद्याप दिड वर्षे तर लोकसभा निवडणूकांना एक वर्षाचा कालावधी राहीला आहे. मात्र आगामी काळात जिल्हास्तरावरील कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने २५ आयएएस अर्थात सनदी अधिकाऱ्यांच्या आज अचानक बदल्या केल्या. तसेच आणखी दुसऱ्या टप्प्यात २० ते ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्यांने सांगितले.

या सनदी अधिकाऱ्यांमध्ये पनवेलचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांची पनवेलच्या आयुक्तपदावरून थेट महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अर्थात राजीव गांधी आरोग्य योजनेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच निवडणूक विभागाचे प्रधान सचिव शेखर चन्ने यांच्याकडे निवडणूक विभागाबरोबरच परिवहन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. डॉ. शिंदे यांच्या ठिकाणी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगरचे महापालिका आयुक्त जी सी. मांगले यांची महानंदच्या  व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे .तर  अहमदनगरचे  जिल्हाधिकारी ए. एम. महाजन यांना पाणीपुरवठा विभागात प्रकल्प संचालक तथा उप सचिव करण्यात आले आहे . मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नवी मुंबईच्या पणन  विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी जालन्याचे जिल्हाधिकारी एस.आर. जोंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संजय यादव यांना एमएमआरडीए मधून थेट अकोल्याच्या मुख्याधिकारी पदी पाठविण्यात आले आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची आता पुणे जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवलकिशोर यांच्या जागी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना औरंगाबादच्या जिल्हाधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अहमदनगर जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणे महापालिकेत आणण्यात आले असून त्यांच्यावर पुणे महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे.

या बदल्या आगामी निवडणूकांच्यादृष्टीने सरकारी योजनांना गती मिळावी या उद्देशाने करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यातील काही अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता. त्यामुळेही या बदल्या करण्यात आल्याचे सांगत आणखी २० ते ३० अधिकाऱ्यांच्या आणखी बदल्या होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या ….

सनदी अधिकारी               सध्याचे ठिकाण                         बदली

१. आंचल गोयल-              आदिवासी विकास प्रकल्प          जिल्हाधिकारी रत्नागिरी

२. एस आर .माळी        महिला आणि बाल विकास             नांदेड मनपा आयुक्त

३. माधवी खोडे -चवरे     अतिरिक्त आयुक्त नागपूर        महिला आणि बाल विकास

४. एस  राममूर्ती          मुख्याधिकारी , अकोला            खनिज महामंडळ ,नागपूर

५.  सी एल पुलकुंडवार  जिल्हाधिकारी , बुलढाणा      सह व्यवस्थापक , एसटी

६. निरुपम डांगे      खनिज महामंडळ ,नागपूर        जिल्हाधिकारी, बुलढाणा

७. बिपीन शर्मा            शिक्षण आयुक्त                   व्यवस्थापकीय संचालक,मेढा

८. रुचेश जयवंशी     पाणीपुरवठा उपसचिव          दिव्यांग  कल्याण आयुक्त ,पुणे

९. एन  के पाटील      दिव्यांग  कल्याण आयुक्त ,पुणे …..   ( प्रशिक्षण )

१०. एम जी अर्दड    मुख्य कार्यकारी अधिकारी ,औरंगाबाद     मनपा आयुक्त , अहमदनगर

११. पावनीत कौर    आदिवासी कल्याण ,जव्हार           मुख्याधिकारी, औरंगाबाद जि.प.

१२. एच . मोडक    ……..                      अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त , नागपूर

 

 

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *