Breaking News

संभाजी राजे यांचा इशारा, तर उठाव होणारच…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेक वेळा केले. त्यातच शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केल्याने संभाजी राजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यांरींना काढून टाकण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली नसल्यान अद्याप त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. त्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून संभाजी राजे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिला.

यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, तसेच या मागणीची दखल घेतली जात नसेल, तर राज्यात उठाव होणार असा इशारा त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला. भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशारा दिला.

दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्यपालांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. अभिवादन करताना पादत्राने बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृची आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती, तर बरे झाले असते, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केले.

 

Check Also

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *