Breaking News

निवडणूक आचारसंहिता आणि कार्यक्रम उद्या जाहिर होणार, आयोगाने दिली माहिती

लोकसभा संसदेचा कार्यकाळ पूर्ण होत आला असल्याने देशातील राजकिय पक्षांकडून अपेक्षित उमेदवार, आघाड्या आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहि करण्याकडे केंद्र सरकारबरोबरच त्या पक्षाच्या राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर निवडणूकीचा कार्यक्रम आणि मतदान कार्यक्रमाच्या निश्चितीचा कार्यक्रम अंतिम करण्याची सारी जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्यावर येऊन पडली. अखेर केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षिय समितीने अखेर काल दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केल्यानंतर उद्या देशातील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचा निर्णय आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला.

सध्या केंद्रातील सत्ताधारी पक्षा भाजपाकडून १९५ आणि ७२ जागेवरील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आल्या. तर काँग्रेसकडून आतापर्यंत ३९ आणि ४३ जागांवरील उमेदवार जाहिर करण्यात आले. तर महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र भाजपाकडून महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. परंतु काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली नाही.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाने राजकिय तापलेल्या वातावरणात इलेक्टोरलचा मुद्दा उपस्थित करत त्या अनुशंगाने इलेक्टोरल खरेदी करणाऱ्यांची यादी आणि त्याचे विहित कालावधीत कोण-कोणत्या राजकिय पक्षांने इन्कॅश केले. त्यात सर्वाधिक इलेक्टोरल बॉण्डमधील रक्कम सत्ताधारी भाजपाला मिळाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तर दुसऱ्या नंबरचा निधी तृणमूल काँग्रेस पक्षाला मिळाला असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या माहितीतून उघडकीस आली आहे.

परंतु केंद्र सरकारने या सर्व गोष्टींना सर्वसामान्य जनतेच्या नजरेसमोरून हटविण्यासाठी निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्त पदांची रिक्त पदे भरण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारच्यावतीने जाहिर करण्यात आली. त्यानतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती २०२२ नंतर पहिल्यांदाच २ रूपयांनी कमी करण्यात आल्या. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील निवडणूकांचा कार्यक्रम उद्या दुपारी ३ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *